आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shooter Jitu Rai Wins Bronze Medal At ISSF World Cup

जितू रायने विश्व नेमबाजी स्पर्धेत पटकावले कांस्य पदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चँगवॉन, कोरिया - भारतीय नेमबाज जितू राय याने काेरियात सुरू असलेल्या विश्व नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावत त्याचा फाॅर्म कायम असल्याचे सिद्ध केले. अाशियाई अाणि राष्ट्रकुलमधील पदकविजेता असलेल्या जितू रायने १० मीटर पिस्तूल प्रकारात १८१.१ गुणांसह तृतीय स्थान पटकावले.
अगदी अल्प गुणांच्या पिछाडीमुळे त्याचे सुवर्णपदक हुकले. काेरियाच्या जीन जाेनगाेहने सुवर्ण, तर म्यानमारच्या नाँग ये तुन याने राैप्यपदक पटकावले. गत जूनमधील पहिल्या अांतरराष्ट्रीय पदकापासून जितूचे हे सातवे पदक ठरले.

प्रारंभ निराशाजनक
या स्पर्धेतील जितूचा प्रारंभ अत्यंत निराशाजनक हाेता. मात्र, उत्तरार्धात त्याने अत्यंत चांगली नेमबाजी करून पदक शर्यतीतील अाव्हान कायम राखले. अंतिम फेरीपर्यंत त्याची कामगिरी फार समाधानकारक नव्हती. त्यामुळे अंतिम फेरीत पात्र ठरलेल्यांमध्ये त्याचा क्रमांक अाठवा हाेता. मात्र, अंतिम क्षणी जितूने मुसंडी मारत कांस्यावर नेम साधण्यात यश मिळाले.