आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंजन सोधीला ‘राजीव गांधी खेलरत्न तर सिंधूला ‘अर्जुन’ पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रंजन सोधीला या वर्षीचा ‘राजीव गांधी खेलरत्न’पुरस्काराने गौरवण्यात येईल. विराट कोहली, पी. व्ही. सिंधू, गगनजित भुल्लरसह 14 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळेल.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणारा 33 वर्षीय सोधी हा सातवा नेमबाज ठरला. माजी नंबर वन डबल ट्रॅप स्टार 2011 मध्ये विश्वचषकातील किताब कायम ठेवणारा पहिला भारतीय नेमबाज होता. सोधीने 2010 मध्ये दिल्लीतील राष्टकुल स्पर्धेत दोन रौप्यपदके जिंकली होती. याच वर्षी त्याने ग्वांगझू आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. मायकेल फरेरा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. सलग तिसर्‍या वर्षी खेलरत्न पुरस्काराने नेमबाजाचा गौरव करण्यात येईल. मागील वर्षी विजयकुमार आणि त्यापूर्वी गगन नारंगला हा पुरस्कार मिळाला होता.


अर्जुन पुरस्कार विजेते
निवड समितीने 14 खेळाडूंच्या नावाची अर्जुन पुरस्कार देण्यासाठी शिफारस केली आहे. यामध्ये विराट कोहली (क्रिकेट), पी.व्ही. सिंधू (बॅडमिंटन), चेक्रोवोलू स्वुरो (तिरंदाजी), रंजित माहेश्वरी (अँथलेटिक्स), कविता चाहल (बॉक्सर), रूपेश शाह (स्नूकर), गगनजित भुल्लर (गोल्फ), सबा अंजुम (हॉकी), राजकुमारी राठोड (नेमबाज), जोश्ना चिनप्पा (स्क्वॅश), मौमा दास (टेबल टेनिस), नेहा राठी, धर्मेंद्र दलाल (कुस्ती), अमितकुमार सरोहा (पॅरा स्पोर्ट्स)

यापूर्वीचे खेलरत्न नेमबाज
अभिवन बिंद्रा 2001-02
अंजली भागवत 2002-03
राजवर्धनसिंग राठोड 2004-05
मानवजितसिंग संधू 2006-07
गगन नारंग 2010-11
विजयकुमार 2011-12