आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींचा कप्पा उघडताच सचिन झाला भावुक, सचिनवरील डॉक्युमेंट्रीचे चित्रिकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतरत्न सचिन तेंडुलकर सध्या त्याच्यावर बनवल्या जात असलेल्या ‘डॉक्युमेंट्री कम फीचर फिल्म’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे.मुंबईचा मेहबूब स्टुडिओ व सचिनच्या घरी गेले तीन दिवस डॉक्युमेंट्रीचा काही भाग चित्रित झाला. या दरम्यान चित्रपट दिग्दर्शक जेम्स एरस्किन यांना सचिनने अनेक वर्षांतील आठवणी सांगितल्या.
वेगवेगळ्या टप्प्यांत सचिनच्या आवडत्या राहिलेल्या बॅट, खास टी-शर्टस व स्टंप्ससह अनेक वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू त्याच्या २४ वर्षांच्या कारकीर्दीचा अतूट भाग आहेत. चित्रीकरणात सहभागी लोकांनी सांगितले की, आठवणींचे कप्पे उघडताच सचिन अनेकदा भावुकही झाला. मितभाषी सचिनने जीवनातील अनेक रंजक किस्सेही सांगितले. सूत्रांनुसार, सचिन चित्रपटाशी संबंधित प्रत्येक बाबीत रस घेत असून रेकॉर्डिंग बारकाईने समजवून घेत आहे.

‘२०० नॉट आऊट’ प्रॉडक्शन हाऊस हा चित्रपट तयार करत आहे. चित्रपट निर्माता रवी भागचनका म्हणाले की, २०१६ मध्ये हा चित्रपट देशातील दोन हजारपेक्षा जास्त चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. डॉक्युमेंट्री मोठ्या पडद्यावर येणारा सचिन हा जगातील पहिला क्रिकेटपटू असेल.

वाढदिवसाच्या फाेटाेंसह इन्स्टाग्रामवर येणार
नजीकच्या सूत्रांनुसार, सचिन लवकरच इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग साइटवरही येणार आहे. २६ एप्रिलला सचिनचा वाढदिवस आहे. ४३ व्या बर्थ-डे सेलिब्रेशनच्या छायाचित्रांसह तो इन्स्टाग्रामवर येईल. त्याची टीम यासाठी तयारी करत आहे. ट्विटरवर त्याचे ९० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर त्याला २.४८ कोटी लोक फॉलो करतात.

फोटो - सचिनने घरातील आपले खास किट दाखवले. त्यात आवडती बॅट व इतर वस्तू आहेत. कव्हरच्या आत सत्य साईबाबासहित अनेक तसबिरी आहेत.
बातम्या आणखी आहेत...