आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shooting National Ranking Competition In Aurangabad

राष्‍ट्रीय रँकिंग स्पर्धा: तरुणदीप, दीपिका अव्वल तिरंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे झालेल्या चौथ्या राष्‍ट्रीय तिरंदाजी स्पर्धेच्या रिकर्व्ह गटात तरुणदीप रॉय आणि दीपिकाकुमारीने देशातील क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. कंपाउंड गटात संदीपकुमार आणि आंध्रप्रदेशच्या व्ही. ज्योती सुरेखाने बाजी मारली.

या स्पर्धेतून आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धेसाठी 16 खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. चॅम्पियनशिपसाठी एकूण 12 आणि आशियाई स्पर्र्धेसाठी 16 तिरंदाजांचा संघात समावेश आहे. या वेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत रिकर्व्ह स्पर्धेत आॅलिम्पियन दीपिकाकुमारीने आपल्या लौकिकानुसार खेळ करत सुवर्णपदक पटकावले. तिने अंतिम फेरीत अर्जुन पुरस्कार विजेती चेंक्रव्हेलु स्वुरोला (7-3 गुण) पराभूत केले. स्वुरोला रौप्य पदक मिळाले. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत डोला बॅनर्जीने तिसरे आणि एल. बोम्बल्यादेवीने चौथे स्थान पटकावले. मुलांच्या गटात तरुणदीप रॉयने सुवर्ण जिंकले. कपिलने रौप्य जिंकले.

कंपाउंड प्रकारात पुरुष गटात अभिषेक वर्माने 145 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. मात्र, क्रमवारीमध्ये त्याला दुसर्‍या स्थानावर राहावे लागले. संदीपकुमारने 140 गुणांसह रौप्यपदक मिळवले. विजेत्या खेळाडूंना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महापौर कला ओझा, फेडरेशनचे सरचिटणीस अनिल केमनानी, कोशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव, सहसचिव प्रमोद चांदूरकर, व्हेरॉकचे एम. पी. शर्मा, साईचे वीरेंद्र भांडारकर, सी. कुर्मी, लक्ष्मीकांत खिची, विनोद नरवडे, गोविंद शर्मा, चंद्रशेखर यांची उपस्थिती होती.

वर्ल्ड चॅम्पियनशिप : भारतीय संघ
रिकर्व्ह प्रकार : महिला - दीपिका कुमारी, चक्रोव्हेल्यु स्वुरो, डोला बॅनर्जी. पुरुष - तरुणदीप रॉय, कपिल, जयंत तालुकदार.
कंपाऊंड प्रकार : महिला - व्ही.ज्योती सुरेखा, त्रिशा देब, पी.लिली चानु. पुरुष - संदीप कुमार, अभिषेक वर्मा, रजत चौहान.

16 सदस्यीय भारतीय तिरंदाजी संघ जाहीर
29 सप्टेंबरपासून तुर्कीत वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा
12 सदस्यीय भारतीय संघ तुर्कीत खेळणार
25 गुणांसह चेक्रव्होलू स्वुरो दुसर्‍या स्थानी
19 गुणांसह बोम्बल्यादेवी चौथ्या स्थानावर


भारतीय संघात निवड झालेल्या कंपाउंड प्रकारातील तिरंदाज डावीकडून अभिषेक वर्मा, रजत चव्हाण, संदीपकुमार, रतन सिंग, व्ही. ज्योती सुरेखा, त्रिशा देब, जहानो हंसदा, पी. लीला चानू. महिला गटाने पोलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. पुरुष संघाला पदकापासून वंचित राहावे लागले होते.

गेल्या वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही पराभूत झालो होतो. यंदा चांगला सराव झाला आहे. संघात बदल न झाल्याने तोच संघ आता पुन्हा स्पर्धेत उतरणार आहे. आमचा सर्वांचा ताळमेळ व फॉर्मात असल्याने पदक पटकावणार.
-संदीपकुमार, तिरंदाज

क्रमवारी
रिकर्व्ह गट पुरूष
खेळाडू - स्थान
तरूणदीप (गुण 21) 1
कपिल (21) 2
जयंत तालुकदार (19) 3
राहुल बॅनर्जी (18) 4
महिला गट
दीपिका कुमारी (31) 1
चेक्रव्होलु स्वुरो (25) 2
डोला बॅनर्जी (20) 3
बोमम्बल्या देवी (19) 4
कंपाऊंड गट पुरूष
संदीप कुमार (27) 1
अभिषेक वर्मा (25) 2
राजत चव्हाण (21) 3
रतन सिंग (17) 4
महिला गट
ज्योती सुरेखा (23) 1
त्रिशा देब (22) 2
जहानो हंसदा (19) 3
पी. लिला चान (18) 4