आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीसीबीची श्रीलंकेला दौर्‍यावर येण्याची ऑफर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- पाकिस्तान क्रिकेट मंडळ लवकरच आगामी काळात मालिका खेळण्यासाठी श्रीलंका टीमला निमंत्रित करण्याची शक्यता आहे. यासाठी पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

मात्र, सहा वर्षांपूर्वी श्रीलंका टीमला दहशतवादी हल्ल्यामुळे दौरा अध्र्यावर सोडून मायदेशी परतावे लागले होते. श्रीलंका पुन्हा पाक दौर्‍यावर जाण्याचा निर्णय घेणार की नाही, हा सध्या चर्चेचा विषय आहे.

‘चीनमध्ये झालेल्या शिखर बैठकीदरम्यान श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे आणि पाकचे राष्ट्रपती ममनुन हुसेन यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान, झालेल्या चर्चेत राष्ट्रपती राजपक्षे यांनी श्रीलंका दौर्‍यावर पाठवण्यासाठीचे सकारात्मक संकेतही दिले होते. त्यामुळेच श्रीलंका संघाला पाक दौर्‍यावर बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असेही सेठी म्हणाले.