आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिकेचा तडका आजपासून ! श्रीलंका-वेस्ट इंडीज यांच्यात रंगणार सामना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंगस्टन (जमैका) - शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेचे संघ समोरासमोर असतील. या मालिकेतील तिसरा संघ भारत आहे. वेस्ट इंडीजची टीम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळीतून बाहेर झाली होती. श्रीलंकेला उपांत्य सामन्यात भारताकडून हार स्वीकारावी लागली. आता दोन्ही संघ मागच्या अपयशाला विसरून नव्याने सुरुवात करण्यास प्रयत्न करतील.

विंडीजचे शक्तिस्थान
यजमान संघाला घरच्या प्रेक्षकांसमोर पराभूत करण्याचे कठीण आव्हान श्रीलंकेसमोर असेल. अष्टपैलू खेळाडू ही वेस्ट इंडीज संघाची उजवी बाजू आहे. असे असले तरीही फलंदाजीत कॅरेबियन टीम संघर्ष करताना चॅम्पियन्स ट्रॉफीत आढळली. त्यांच्याकडे गेलसह अनेक स्फोटक फलंदाज आहेत. मात्र, खेळपट्टीवर टिकून खेळणार्‍या फलंदाजाची संघाला गरज आहे.

श्रीलंकेचे फिरकी आक्रमण आहे मजबूत : श्रीलंकेची गोलंदाजी अत्यंत मजबूत आहे. विशेषत: त्यांचे फिरकीपटू सामन्यात निर्णायक भूमिका पार पाडू शकतात. किंगस्टनची खेळपट्टी आता पूर्वीप्रमाणे वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल राहिलेली नाही. संगकारा, जयवर्धनेसारखे अनुभवी खेळाडू असल्याने श्रीलंकेची फलंदाजीही मजबूत आहे.

संभाव्य संघ
वेस्ट इंडीज : डेवेन ब्राव्हो (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, जॉन्सन चाल्र्स, क्रिस गेल, मालरेन सॅम्युअल्स, डेवेन स्मिथ, केरोन पोलार्ड, डॅरेन सॅमी, दिनेश रामदीन, रवी रामपॉल, केमर रोच, सुनील नारायण, टिनो बेस्ट.
श्रीलंका : अँग्लो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, उपुल थरंगा, कुमार संगकारा, लाहिरू थिरिमाने, महेला जयवर्धने, जीवन मेंडिस, दिनेश चांदिमल, अजंता मेंडिस, नुवान कुलशेखरा, लसिथ मलिंगा, दिलहारा लोकुटिगे, शमिंडा इरंगा, सचित्र सेनानायके, रंगना हेराथ.