(फोटो - पुलेला गोपीचंद सोबत सायना नेहवाल)
भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालने प्रशिक्षक पुलेला गोपीचंद पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पुलेला गोपीचंदांच्या मार्गदर्शनाखालीच सायनाने जागतिक क्रमवारित दुस-या स्थानी झेप घेतली होती.
सायनाला सध्या अपेक्षित फॉर्म नाही. गोपिचंद यांचे अन्य शिष्य पी. व्ही. सिंधू आणि कश्यप कामगिरी उंचावत असल्याने सायना दडपणाखाली असून काही दिवस अन्य प्रशिक्षकांची मदत घेण्याला तिने प्राधान्य दिल्याचे समजते. बंगलोरमध्ये सायना 15 दिवस सराव करणार आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हरल्यानंतर बातमी समोर
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोपीचंद कश्यप आणि सिंधूकडेच जास्त लक्ष देत असून सायनाकडे दूर्लक्ष होत असल्याने सायना प्रशिक्षक बदलणार आहे. उल्लेखनिय म्हणजे कोच आणि खेळाडूच्या रुपामध्ये सायना आणि गोपीचंद यांची अप्रतिम जोडी ठरली होती.
काय म्हणाली सायना
‘‘आशियाई स्पर्धेसाठी विमल कुमार सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे. उबेर चषकादरम्यान त्यांनी दिलेल्या ‘टिप्स’ मला फायदेशीर ठरल्या. त्यामुळे आशियाई स्पर्धेपूर्वी विमल सरांचे मार्गदर्शन घेण्याचे मी ठरवले आहे. जागतिक स्पर्धेदरम्यान गोपी सरांशी याबाबत बोलले. त्यांनी मला तशी परवानगी दिली आहे.’’
पुढील स्लाइडवर वाचा सायनाने का बदलेले प्रशिक्षक