(फाइल फोटो - ज्वाला गुट्टा)
ग्लासगो - 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाने रौप्य पदकाची कामगिरी केली. तरीसुध्दा टीकाकारांनी तिच्यावर फॉर्म गेल्याची टिप्पणी केली होती. तसेच तिच्यावर बंदीची मागणी केली होती. ज्वालाने टीकाकारांना चांगलेच फटकारले. रौप्य पदक कसे मिळाले? असा प्रतिसवालही तिने केला आहे.
ज्वाला गुट्टाने आपल्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे. '' मला आशा आहे की, माझ्या कामगिरीने माझा परिवार आणि मित्रांमध्ये माझी कामगिरी अभिमानास्पद नक्कीच आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास दर्शिलिला, मला प्रोत्साहन दिले त्या सर्वांचे मी आभार मानते'', असे ज्वाला म्हणाली.
एका वर्षांत तीन पदकांची कमाई अजून काय हवे?
आम्ही या वर्षी तीन पदक पटकाविली असून हे वर्ष आमच्यासाठी खास राहिले आहे. टीकारांना प्रतिउत्तर देताना ती म्हणाली की,''मी लोकांना उत्तरे देऊन-देऊन कंटाळली आहे. परंतु माझ्यावर जर प्रतिबंध असता तर रौप्य पदकही भारतास मिळाले नसते.''
पुढील स्लाइडवर पाहा, ज्वाला गुट्टाची निवडक छायाचित्रे...