आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपचा सहावा दिवस संस्मरणीय ठरला. यारोस्लाव श्वेदोवाने ‘गोल्डन सेट’ सह विजय मिळवला. तिने फ्रेंच ओपन चॅम्पियन इटलीच्या सारा इराणीला स्पर्धेबाहेर केले. दुसरीकडे मारिन सिलिच आणि सॅम क्वेरी यांनी स्पर्धेतील दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा सामना खेळला. इंग्लंडचा खेळाडू अँडी मुरेचा सामना नियमांना मोडून रात्री 11 वाजता संपला.
वाइल्डकार्डधारक श्वेदोवाने शनिवारी महिला एकेरीच्या तिस-या फेरीत इटलीच्या सारा इराणीला 6-0, 6-4 ने पराभूत केले. तिने 15 मिनिटे चाललेल्या पहिल्या सेटमध्ये एकही गुण गमावला नाही. यानुसार ती ‘गोल्डन सेट’ जिंकणारी ग्रँडस्लॅम स्पर्धेची पहिली खेळाडू बनली आहे. एकही गुण न गमावता सेट जिंकण्याला ‘गोल्डन सेट’ म्हणतात.
स्पर्धेचे आयोजक आणि आयटीएफनुसार श्वेदोवा अशी कामगिरी करणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. गोल्डन सेट जिंकण्याचा पहिला मान अमेरिकेचा खेळाडू बिल स्कॅनलनने मिळवला होता. त्याने 1985 मध्ये ब्राझीलच्या मार्कोस होचेवरला गोल्ड कोस्ट क्लासिक स्पर्धेत 6-2, 6-0 ने नमवले होते.
सिलिचचा संघर्षपूर्ण विजय
पुरुष एकेरीत क्रोएशियाच्या मारिन सिलिच आणि अमेरिकेच्या सॅम क्वेरी यांनी तिस-या फेरीतील सामना पाच तास आणि 31 मिनिटे रंगला. या सामन्यात सिलिचने 7-6, 6-4, 6-7, 17-15 ने विजय मिळवला. विम्बल्डनचा सर्वांत मोठा सामना (11 तास आणि 05 मिनिटे) अमेरिकेचा जॉन इस्नर आणि फ्रान्सदरम्यान खेळवण्यात आला होता.
मुरे आणि फेररसुद्धा चौथ्या फेरीत
पुरुष एकेरीत चौथा मानांकित इंग्लंडचा अँडी मुरे आणि सातवा मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेरर यांनीसुद्धा चौथ्या फेरीत प्रवेश केला. मुरेने सायप्रसच्या मार्कस बगदातिसला 7-5, 3-6, 7-5, 6-1 ने पराभूत केले. हा सामना 11 वाजून दोन मिनिटाला संपला. विम्बल्डनच्या नियमानुसार 11 वाजता सामना पूर्ण न झाल्यास त्या लढतीला दुस-या दिवशी खेळवले जाते. मात्र, या सामन्याला हा नियम लावण्यात आला नाही. डेव्हिड फेररने अमेरिकेच्या अँडी रॉडिकला 2-6, 7-6, 6-4, 6-3 ने
मात दिली.
दमदार श्वेदोवा
श्वेदोवा आकडेवारी सारा इराणी
06 ऐस 00
02 डबल फॉल्ट 01
35 विनर्स 06
14 नेट पॉइंट 07
05 ब्रेक पॉइंट 01
10 सामान्य चुका 07
59 एकूण गुण 27
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.