आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sim Bhullar Of India For NBA American Basketball Team, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत इतिहास रचणार हा \'भारतीय वंशाचा खेळाडू\', उंची आहे 7 फूट 5 इंच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो- अमेरिकेच्या प्रतिष्ठीत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या ड्राफ्टमध्ये भारतीय वंशाचा क्रीडापटू पदार्पण करण्यासाठी तयार आहे. 21 वर्षाचा गुरसिमरन उर्फ सिम भूल्लरला अमेरिकेच्या प्रिमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
टोरंटोच्या ब्राम्पटन येथील रहिवासी असलेला भुल्लर एनबीएमध्ये खेळणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू ठरेल.
उंचीच्याबाबतीत बनवणार आहे रेकॉर्ड
सिमची उंची 7 फूट 5 इंच आहे. जरी तो एखाद्या टीममध्ये सहभागी झाला तरी तो एनबीएमध्ये खेळणारा 8 व्या क्रमांकाचा सर्वाधिक उंचीचा खेळाडू ठरणार आहे. एनबीएमध्ये सगळ्यात उंच खेळाडूचा वर्ल्ड रेकॉर्ड स्वतंत्रपणे रोमानियाचा जॉर्ज मॉरिसन आणि सुदानचा मानुटे बोलच्या नावावर आहे. या दोन्ही खेळाडूंची उंची 7 फूट 7 इंच आहे.
मित्रांमध्ये 'सिम' या नावाने प्रसिद्ध असलेला गुरसिमरनचे संपूर्ण कु़टूंब या बातमीने आनंदित झाले आहे. त्याची मोठी बहिण अवनीत म्हणाली, "त्याच्या उंचीमूळे तो नेहमीच लोकांच्या लक्षात राहायचा. खेळातही तो उत्कृष्ट आहेच. सिमने सगळ्यात आधी न्यू मेक्सिको स्टेट युनिव्हर्सिटी आणि त्याच्या बास्केटबॉल टीममध्ये प्रवेश घेतला होता. सिम तिथे सेंटर पोझिशनवर खेळायचा. तो दोनदा वेस्टर्न अॅथलेटीक कॉन्फरन्स दौऱ्याचा सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरला होता."
(फोटो- सहकारी खेळाडूसोबत हितगुज करताना सिम भूल्लर)
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, सिमच्या कुटूंबात सगळेच आहेत उंच...