आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Simon Upsets Chong Wei To Bag Singapore Open News In Divya Marathi

सिंगापूर ओपन बॅडमिंटन : वांग, सांतोसो चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - चीनची यिहान वांग आणि इंडोनेशियाचा सिमोन सांतोसो सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन ठरले. या दोघांनी अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीचा किताब पटकावला. जगातील नंबर वन महिला खेळाडू झुईरुई लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दुसर्‍या मानांकित वांगने अंतिम सामन्यात चीनच्या झुईरुईला सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. तिने 21-11, 21-14 अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने 45 मिनिटांत महिला एकेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले. चीनच्या खेळाडूने दुसर्‍या गेममध्ये पुनरागमन करताना वांगला रोखण्याचा प्रयत्न केला होता.

युन-कै लुला दुहेरीचे विजेतेपद
चीनच्या युन काई व कै लुने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या या जोडीने अंतिम सामन्यात चीन तैपईच्या शेंग मु ली व चीआ हैन्स त्साईला 21-19, 21-19 ने धूळ चारली.

ली चोंग वेईला उपविजेतेपद
जगातील नंबर वन ली चोंग वेईला स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपविजेतेपद मिळाले. त्याला अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या सिमोन सांतोसोने 48 मिनिटांत 21-15, 21-10 ने हरवले.