आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#Rio: भारतात परतल्यावर सिंधू आवडीची हैदराबादी बिर्याणी चाखणार, \'रूस्तम\'ही पाहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिंपिक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधू - Divya Marathi
ऑलिंपिक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधू
रिओ- पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी रात्री ऑलिंपिकमध्ये इतिहास रचला. सिल्वर मेडल जिंकणारी भारताची ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या यशापर्यंत पोहचण्यासाठी तिला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. कोच गोपीचंद यांच्या सुचना पाळाव्या लागत होत्या. मागील तीन महिन्यापासून सिंधूजवळ मोबाईल नव्हता. कोच गोपीचंद यांनी सांगितले की, आता सिंधूचा फोन तिच्या ताब्यात देणार आहे. तिने देशासाठी मेडल जिंकले आहे. त्यांना आनंद व्यक्त करण्याचा हक्क आहे. सिंधू भारतात परत येताच 'रुस्तम' चित्रपट पाहणार आहे. तर बिर्याणीसोबत तिच्या आवडीचे आयस्क्रीम खाण्याचा तिचा बेत आहे. खूप मेहनत घ्यायचे कोच गोपीचंद...
- सिंधूच्या यशामागे कोच पी. गोपीचंद यांचा मोठा हात आहे. गोपीचंद यांचे ट्रेनिंग खूपच कडक शिस्तीचे असते. याबाबत सांगितले जात आहे की, सायना नेहवाल पासून श्रीकांत- सिंधू यांच्यापर्यंत ट्रेनिंग फॉर्मेटमध्ये त्यांनी काहीही बदल केला नाही.
- गोपीचंद म्हणतात, "मागील 3 महिन्यापासून सिंधू हिच्याजवळ मोबाईल फोन नव्हता. आता ती विजेती आहे. तिचा फोन तिला लवकरच देणार आहे.
- "मागील 12-13 दिवसापासून मी तिच्या आवडीचे दही गोड दही खाण्याचे बंद केले होते. ते तिला खूप आवडते. मी तिला आयस्क्रीम खाऊ देत नव्हता. आता ती तिला जे हवे ते काहीही खावू शकते.
- गोपीचंद यांच्या म्हणण्यानुसार, "मागील दोन महिने सिंधूने प्रचंड मेहनत घेतली. काहीही तक्रार न करता अनेक बाबींचा त्याग केला. आता तिला आनंद व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मी खूप आनंदी आहे."
कोचची इच्छा होती- राष्ट्रगीत वाजावे, तिरंगा वर जावा... सिंधूने करून दाखवले
- "ती खूप तरूण आहे. मला वाटतेय ती रिओ ऑलिंपिकमधून खूप काही शिकेल. ती या खेळात खूप पुढे जाऊ शकते."
- गोपीचंद यांनी सिंधूला सल्ला दिला आहे की, रिओतील सिल्वर जिंकल्याचा आनंद ना व्यक्त कर ना सुवर्ण न जिंकल्याचे दु:ख.
- गोपीचंदनी सांगितले की, जे काही घडले ते विसरून जाण्याचा सल्ला दिला आहे. फक्त देशासाठी मेडल जिंकल्याचे लक्षात ठेव. माझी इच्छा होती भारताचा तिंरगा झेंडा वर उचलला जावा व माझ्या देशाचे राष्ट्रगीताची धून वाजावी. सिंधूने हे सर्व केले आहे. हे सर्व आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
घरी येताच सिंधू 'रुस्तम' पाहणार
- भारतात परतताच व हैदराबादमध्ये गेल्यानंतर सिंधू 'रुस्तम' सह बॉलिवूडची लेटेस्ट चित्रपट पाहणार आहे.
- यासोबतच ती आयस्क्रीम आणि हैदराबादी बिर्याणी खाणार आहे. कठोर सराव, वजन व फिटनेससाठी तिने अनेक आवडीचे पदार्थ चाखले नव्हते.
- सिंधूचे वडील पी. व्ही. रमण्णा यांच्या माहितीनुसार, " सिंधू खूप आनंदी आहे. हैदराबादमध्ये येताच ती रुस्तम आणि मोहेनजो दडो फिल्म पाहणार असल्याचे सांगितले. तसेच आयस्क्रीम आणि बिर्याणी खाणार आहे.
पुढे स्लाईडद्वारे वाचा व पाहा, पी व्ही सिंधू भारतात येताच काय काय करणार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...