आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंधू विजयी; अवध वॉरियर्सची आगेकूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- आयबीएलमध्ये अवध वॉरियर्सने शनिवारी मुंबई मास्टर्सवर 3-2 ने मात केली. किडो-पियाने मिश्र दुहेरीत निर्णायक विजय मिळवून मुंबईचा पराभव केला. या जोडीने इवानोव व सिक्कीला 21-19, 21-15 ने हरवले. तत्पूर्वी, पी.व्ही. सिंधूने मुंबई मास्टर्सच्या टिने ब्राऊनला 21-12, 19-21, 11-8 ने पराभूत केले. मार्सिस किडो व मॅथ्यूस बोईने पुरुष दुहेरीत सुमीत रेड्डी व मनू अत्रीवर 21-16, 21-14 ने मात केली.

तत्पूर्वी पुरुष एकेरीचा सामना जिंकून मुंबई मास्टर्सने 1-0 ने आघाडी मिळवली होती. मुंबईच्या व्लादिमीर इवानोवने अवध वॉरियर्सच्या आरएमव्ही गुरुसाईदत्तला 21-18, 20-21, 11-9 पराभूत केले. पुरुष एकेरीत ली चोंग वेईने अवधच्या पी. कश्यपला 21-15, 20-21, 11-5 अशा फरकाने पराभूत केले.

बंगा बीट्ससाठी आज करा वा मरा
आयबीएलमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी बंगा बीट्सला यापुढच्या दोन्ही लढती जिंकाव्या लागणार आहेत. दिल्ली स्मॅशर्सविरुद्ध रविवारी होणा-या लढतीपासूनच हे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.