आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singapor Open Badmintan: Saina Entered Final Sixteenth

सिंगापूर ओपन बॅडमिंटन: सायनाचा अंतिम सोळात प्रवेश; श्रीकांतचा धक्कादायक पराभव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसरी मानांकित भारताच्या सायना नेहवालने दुस-या फेरीत धडक दिली. मात्र, थायलंड ओपनचा चॅम्पियन के. श्रीकांतचा पहिल्याच फेरीत पराभव झाला.


सायनाने सिंगापूरच्या जुआन गू हिला 21-14, 23-21 ने पराभूत करीत अंतिम सोळा खेळाडूंत प्रवेश केला. सायनाने हा सामना अवघ्या 40 मिनिटांत आपल्या नावे केला. तिने थायलंड ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत जुआनकडून झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला. पुरुष गटात थायलंड ओपन जिंकून झोतात आलेला सहावा मानांकित श्रीकांतला व्हिएतनामच्या तिएन मिन्ह एनगुएनने 56 मिनिटांत पराभूत केले. एनगुएनने हा सामना 19-21, 21-16, 21-12 असा जिंकला.


साईप्रणीतने मिळवला आश्चर्यकारक विजय
भारताचा पात्रता फेरीचा खेळाडू बी. साईप्रणीतने सिंगापूर बॅडमिंटन ओपन स्पर्धेत आश्चर्यकारक विजय मिळवताना दुसरा मानांकित हाँगकाँगच्या यून हूला एकतर्फी लढतीत 21-9, 21-10 असे पराभूत केले. या विजयासह त्याने प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. साईप्रणीतने अवघ्या 30 मिनिटांत विजय मिळवला. प्रणीत आणि यून यांच्यात हा दुसरा सामना होता. यापूर्वी दोघांत 2009 मध्ये व्हियतनाम इंटरनॅशनल चॅलेंजमध्ये सामना झाला होता. त्या वेळी यूनने प्रणीतला हरवले होते. या वेळी प्रणीतने पहिल्या फेरीत आघाडी कायम ठेवताना आश्चर्यकारक विजय मिळवला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत आलेल्या प्रणीतने विजय मिळवला.