आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singapur Open Badmintan: Jui Rui Li Entered In Final

सिंगापूर ओपन बॅडमिंटन: जुई रुई ली फायनलमध्ये !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - ऑलिम्पिक चॅम्पियन आणि टॉप सिडेड चीनची जुई रुई ली आणि तिच्याच देशाची यिहान वांग यांच्यात सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेची फायनल रविवारी खेळवली जाईल. पुरुष गटात फायनलचा सामना इंडोनेशियाचा टॉमी सुगियार्तो आणि पाचवा मानांकित थायलंडच्या बुनसाक पोनसाना यांच्यात होईल.


सुगियार्तोने सेमीफायनलमध्ये सहावा मानांकित व्हियतनामच्या तिएन मिन्ह एनगुएनला एक तास आणि 13 मिनिटे रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत 20-22, 21-19, 21-15 ने हरवले. पोनासानाने जपानच्या ताकुमा उएदाचे आव्हान अवघ्या 35 मिनिटांत संपवले. पोनसानाने 21-8, 21-15 ने विजय मिळवला. महिला एकेरीत लीने आपल्या देशाच्या सून जूला 37 मिनिटांत 21-13, 21-11 ने हरवले.