आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singapur Open Super Series Badminton Competation: Saina Entered In Final Eight

सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा: सायना अंतिम आठमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सायना नेहवालने गुरुवारी सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलच्या रोमांचक लढतीत जपानच्या एरिको हिरोसेवर 61 मिनिटांमध्ये 16-21, 21-16, 21-9ने विजय मिळवला. यासह तिने अंतिम आठमधील प्रवेश निश्चित केला. तिचा सामना लिंडावेनीसोबत होईल.सायनाला उपांत्यपूर्व फेरीत विजयासाठी शर्थीची झुंज द्यावी लागेल. यापूर्वी इंडोनेशिया व थायलंड ओपनच्या अंतिम चारमध्ये तिचा पराभव झाला.


असा मिळवला विजय
सायनाने 15 स्मॅश विनर व 13 नेट विनर मारले. पहिल्या गेममध्ये हिरोसेने 14-14 ने बरोबरी घेत सायनावर मात केली. त्यानंतर सायनाने पुनरागमन करताना हिरोसेला दुस-या गेममध्ये 21-16 ने हरवले. त्यानंतर तिस-या गेममध्ये तिने 8-2 ने आघाडी घेत 21-9 ने सहजपणे विजय मिळवला. यासह तिने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.


विष्णू-अपर्णा बाहेर
भारताच्या अरुण विष्णू व अपर्णा बालनचे सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले. या जोडीला मिश्र दुहेरीत इंडोनेशियाच्या प्रवीण जॉर्डन व विता मारिसने 27 मिनिटांत पराभूत केले. इंडोनेशियाच्या जोडीने 21-10, 21-18 अशा फरकाने सामना जिंकला.