आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sir A Football : Carlos Tevej Goal Wining The Juvents

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरी ए फुटबॉल स्पर्धा: कार्लोस तेवेजचा शानदार गोलने जुवेंटस विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिलान - इटलीतील सिरी ए स्पर्धेत अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर कार्लोस तेवेजने शुभारंभाच्या सामन्यात केलेल्या गोलच्या बळावर जुवेंटस संघाने सॅम्पडोरियावर 1 - 0 ने विजय मिळविला. तर एसी मिलान संघाला व्हेरोनाकडून धक्कादायकरीत्या पराभव पत्करावा लागला.


तेवेजला 21 व्या मिनिटाला मिळालेल्या एका पासचा सुयोग्य उपयोग करता आला नाही. मात्र, पोग्बाकडून मिळालेल्या एका अप्रतिम पासचे रूपांतर गोलमध्ये करीत तेवेजने जुवेंटसला विजयी गोल करून दिला. त्यानंतर अखेरपर्यंत एकही गोल न झाल्याने तोच गोल निर्णायक ठरला.


दुसरीकडे व्हेरोनाच्या संघाने तब्बल 11 वर्षानंतर सिरी ए फुटबॉल स्पर्धेत पुनरागमन केले. या संघाने सामन्यात धक्कादायक निकालाची नोंद केली. या संघाने सामन्यात एसी मिलानवर 2-1 अशा फरकाने विजय मिळवून दिला. लुका टोनीने तब्बल दोन गोल करून संघाचा विजय निश्चित केला. मिलानला रोमांचक सामन्यात एकमेव गोल करता आला. मात्र, या संघाला सामन्यात पराभवाचे सावट दूर करता आले नाही.


आर्सेनल विजयी
ईपीएलमध्ये आर्सेनलने फुल्लामचा 3-1 ने पराभव केला. पोडोलस्की (41, 68मि.) आणि गिराऊडने (14 मि.) संघाला विजय मिळवून दिला.