आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सर’ जडेजा शिखरावर, वनडे क्रिकेटमध्ये जगातला नंबर वन गोलंदाज ठरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - आपल्या जबरदस्त खेळाच्या बळावर कर्णधार धोनीकडून ‘सर’ची उपाधी मिळवणारा रवींद्र जडेजा आता वनडे क्रिकेटमध्ये जगातला नंबर वन गोलंदाज ठरला आहे. आयसीसी वनडे गोलंदाजांच्या यादीत 16 वर्षांनंतर प्रथमच भारतीय खेळाडूने नंबर वनच्या सिंहासनावर पोहोचण्याचा मान मिळवला आहे. जडेजाच्या पूर्वी 1996 मध्ये अनिल कुंबळेने गोलंदाजांच्या यादीत नंबर वनचे स्थान मिळवले होते.

आयसीसीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत डावखुरा फिरकीपटू जडेजाला चार स्थान आणि 21 गुणांचा फायदा झाला. झिम्बाब्वेविरुद्ध पाच विकेट घेणारा जडेजा आता 733 गुणांसह अव्वलस्थानी आहे. त्याच्यासोबत वेस्ट इंडीजचा जादुई फिरकीपटू सुनील नरेनसुद्धा संयुक्तपणे अव्वल स्थानी कायम आहे. लेगस्पिनर अमित मिर्शाने 47 स्थानांची झेप घेतली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत 18 बळी घेणारा मिर्शा आता 32 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. 24 वर्षीय रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचे 377 गुण आहेत. बांगलादेशचा शाकिब-उल-हसन (387) जगातला नंबर वन ऑलराउंडर आहे.

मनिंदरच्या नावेही यश
वनडे क्रिकेट गोलंदाजांच्या यादीत नंबर वनच्या खुर्चीवर पोहोचणारा जडेजा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. भारतीय गोलंदाजांत सर्वप्रथम हे यश मनिंदरसिंगने मिळवले होते. डिसेंबर 1987 ते नोव्हेंबर 1988 या काळात मनिंदर नंबर वन गोलंदाज होता. त्यानंतर कपिलदेव (मार्च 1989) आणि अनिल कुंबळे (नोव्हेंबर-डिसेंबर 1996) यांनीसुद्धा अव्वल स्थान पटकावले.


जडेजाची आकडेवारी
80
वनडे
95
विकेट
1242
धावा
06


अर्धशतके
रवींद्र जडेजाच्या जागी परवेझ रसूलला खेळवण्याचा निर्णय घेणे अवघड होते. कारण, जडेजा कोणत्याही क्षणी बळी मिळवून देणारा गोलंदाज आहे. शिवाय त्याचे दमदार क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असते. - विराट कोहली, भारतीय कर्णधार.

2013 मधील टॉप-5 गोलंदाज
खेळाडू देश सामने विकेट
रवींद्र जडेजा भारत 22 38
लेसिथ मलिंगा श्रीलंका 21 32
सईद अजमल पाकिस्तान 17 31
मॅक्लारेन द. आफ्रिका 17 30
एम. मॅक्लीघन न्यूझीलंड 10 29
टॉप-5 फलंदाज (वनडे)
क्रम फलंदाज देश गुण
01. हाशिम आमला द. आफ्रिका 853
02. एल्बी डिव्हिलर्स द. आफ्रिका 845
03. कुमार संगकारा श्रीलंका 829
04. विराट कोहली भारत 819
05. जोनाथन ट्रॉट इंग्लंड 789


2013 मध्ये यशस्वी
रवींद्र जडेजाने या वर्षी अर्थात 2013 मध्ये सर्वाधिक 38 बळी घेतले आहेत. या दमदार गोलंदाजीच्या बळावरच त्याने क्रमवारीत या वर्षी 33 पायर्‍यांचे शिखर गाठले. या वर्षी जानेवारीत तो 557 गुणांसह 34 व्या क्रमांकावर होता. जडेजाने एकूण 80 वनडेत आतापर्यंत 95 बळी घेतले आहेत.

टॉप-5 गोलंदाज (वनडे)
क्रम खेळाडू देश गुण

01. रवींद्र जडेजा भारत 733
02. सुनील नरेन वेस्ट इंडीज 733
03. स्टीव्हन फिन इंग्लंड 718
04. जेम्स अँडरसन इंग्लंड 714
05. सईद अजमल पाकिस्तान 713

शिखर धवनची 16 स्थानांनी प्रगती
फलंदाजांच्या यादीत शिखर धवन आणि सुरेश रैना यांना लाभ झाला. शिखरने 16 स्थानांच्या प्रगतीसह 23 वे स्थान मिळवले. रैना आणि जडेजा यांनी प्रत्येकी एका स्थानाच्या सुधारणेसह अनुक्रमे 17 आणि
59 वे स्थान मिळवले. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी एकेक स्थानाच्या घसरणीसह अनुक्रमे चौथ्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.