आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sir Vivian Richards Stadium Antigua News In Marathi

'सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम'मध्ये दर्शकांचा थाट, पूलमध्येही घेतात खेळाचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅरीबियन दिग्गज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांना जगातील सर्वात विध्वंसक फलंदाज मानले जाते. कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजी विरुद्ध ते वेगाने धावा काढण्यात माहीर होते. त्यांच्या महानतेचा प्रत्यय याच गोष्टीवरून दिसून येतो, की वेस्ट इंडिजमध्ये त्यांच्या नावावर एक क्रिकेट स्टेडियम आहे. व्हिव्हियन रिचर्ड्स जगातील दुसरे असे खेळाडू आहेत,ज्यांच्या नावावर एक पूर्ण स्टेडियम आहे. या व्यतिरिक्त केवळ ब्रायन लाराच्या नावावर स्टेडियम आहे.

एंटीगाच्या नॉर्थ साउंड स्थित 'सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम' चे उद्धाटन वर्ल्ड कपच्या आयोजनामध्ये झाले होते. २००७ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या वेळी या स्टेडियमचे निर्माण करण्यात आले होते.

स्विमिंगपूल असलेले स्टेडियम
क्रिकेटच्या स्टेडियममध्ये फक्त खेळाडूंसाठी स्विमिंगपूलची व्यवस्था असते. परंतु एंटीगा येथील 'सर व्हिव्हियन रिचर्ड्स' एकमात्र असे स्टेडियम आहे, ज्याठिकाणी दर्शक कडक उनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्विमिंगपूलमध्ये उतरून खेळाचा आनंद घेऊ शकतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये दर्शकांचा कशाप्रकारे असतो थाट...