आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Skipper Virat Kohli's Unbeaten 139 Helps India Defeat Sri Lanka And Complete 5 0 Rout

सचिनच्या खूपच पुढे आहे विराट, सहा डावानंतर ठोकतोय शतक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: 5-0 असा पराभव झाल्यानंतर रविवारी रांचीत पव्हेलियनमध्ये परतत असताना श्रीलंकन खेळाडू. या सर्वात पुढे आहे वनमॅन आर्मी एंजेलो मॅथ्यूज.

क्रीडा डेस्क- भारतीय दौ-यावर अर्ध्या तयारीने पोहचलेली श्रीलंकन क्रिकेट टीमला 5-0 असा दारूण पराभव पत्कारावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळलेल्या भारतीय संघाचे हिरो ठरले ते रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, विराट कोहली, उमेश यादव आणि अक्षर पटेल.

विराट कोहलीने या एकदिवसीय मालिकेत रविवारी पाचव्या सामन्यात शतक ठोकले व भारताला विजय मिळवून दिला. 146 सामने खेळलेला व 138 डाव खेळलेल्या विराटने आतापर्यंत 21 शतके ठोकली आहेत. याचाच अर्थ असा की साडेसहा डाव खेळल्यानंतर विराटने शतक ठोकल्याचे आकडेवारीतून दिसून येईल. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या 22 शतकांपासून विराट केवळ शतक दूर आहे. 21 शतक ठोकतानाच विराट कोहलीने 33 अर्धशतक झळकावली आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकांच्या यादीत कोहली पाचव्या स्थानावर पोहचला आहे. सचिन तेंडुलकर (49), रिकी पाँटिंग (30), सनथ जयसुर्या (28), सौरव गांगुली (22) यांच्यानंतर आता कोहलीचा (21 शतके) 5 वा क्रमांक लागतो. विराटचा पुढील दीड-दोन वर्षे असाच खेळ राहिला तर 2016 अखेरीस तो सचिननंतर शतके ठोकण्याच्या यादीत दुसरा असेल.

विश्वविक्रमवीर सचिनची सरासरी आहे 9.22 इतकी- विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकरने सरासरी 9.22 नुसार शतक ठोकले आहे. सचिनच्या नावावर 452 डावात 49 शतके आहेत. रिकी पाँटिंगने 12.16 टक्केच्या सरासरीने शतक ठोकले आहे. त्याच्या नावावर 365 डावात 30 शतके आहेत. श्रीलंकन खेळाडू सनथ जयसुर्या याची सरासरी 21.65 इतकी आहे. त्याने 433 डावात 28 शतके ठोकली आहेत तर, सौरव गांगुलीने 14.13 च्या सरासरीने शतक ठोकले आहे. सौरवने 311 डावात 22 शतके ठोकली आहेत.