आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SL Vs NZ ICC World Cup 2015 : Streaker Block The Cricket Match

SL Vs NZ सामन्यादरम्यान सुरक्षा भेदून मैदानात घुसला STREAKER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Poll Widget Placeholder
(फोटो: न्यूझीलंड-श्रीलंका लढतीदरम्यान घुसला स्ट्रीकर)
क्राइस्टचर्च- हेगल ओव्हल मैदानावर नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका सामन्यात काही काळ व्यत्यय आला होता. दरम्यान, एक स्ट्रीकर अर्थात विवस्त्र पुरुष प्रेक्षक मैदानात घुसला होता. त्याला मैदानातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षा गार्ड्‍सला मोठी कसरत करावी लागली. स्ट्रीकरला मैदानाबाहेर काढल्यानंतर सामना पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाला होता.

यापूर्वी देखील अनेक सामन्यात स्ट्रीकरमुळे व्यत्यय आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या एशेज मालिकेतील सामन्यातही स्ट्रीकर मैदानात घुसून व्यत्यय आणला होता.
1976मध्ये पहिल्यांदा समोर आला होता स्ट्रीकर
सन 1976 मध्ये खेळल्या गेलेल्या एशेज मालिकेच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात स्ट्रीकर पहिल्यांदा समोर आले होते. 'लॉर्ड्स'वर हा सामना खेळला जात होता. सामना सुरू असताना एका क्रिकेट चाहत्याने विवस्त्र होऊन मैदानात प्रवेश केला होते. स्टम्सवरून उड्या घेतल्या. क्रिकेटर्सला भेटण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा गार्ड्‍सनी त्याला तत्काळ मैदानाबाहेर काढले होते.
दरम्यान, सामना पाहाण्यासाठी आलेले काही प्रेक्षक विवस्त्र होऊन मैदानात पळत सुटतात. आपल्या आवडत्या क्रिकेटर्सला भेटण्याचा प्रयत्न करत असतात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सुरक्षा भेदून मैदानात घुसलेल्या 'स्ट्रीकर'चे फोटो...