आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाची घसरण : आयपीएल स्टार्सचे भाव गडगडणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलर्ससमोर भारताच्या रुपयाच्या घसरणीची झळ आयपीएल फ्रँचायझींना पोहोचली आहे. अलीकडच्या काळातील रुपयाचे अवमूल्यन 54 वरून 65 पर्यंत झाल्याने परदेशी खेळाडूंना त्यांच्या मानधनाची रक्कम डॉलर्समध्ये मोजताना फ्रँचायझींना प्रत्येक डॉलरमागे 10 ते 15 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

परदेशी खेळाडूंचे होणारे संभाव्य नुकसान त्यामुळे टळले असले तरीही भारतीय खेळाडूंना मात्र 46 रुपये प्रतिडॉलर याप्रमाणेच पैसे मिळणार आहेत. साधारणपणे रुपयांमधील हा फरक भारताच्या सर्व अग्रगण्य आयपीएल आघाडीच्या खेळाडूंना खिशावर मोठा आघात करणारा आहे. 2011 ते 2013 या कालावधीसाठी भारतीय खेळाडूंशी करार करताना 46 रुपये प्रतिडॉलर ही रक्कम निश्चित करण्यात आली होती. भारतीय खेळाडूंना त्या दरानेच रक्कम मिळाली आणि यापुढे मिळणार आहे. परदेशी खेळाडूंसाठी मात्र करारात वेगळे कलम टाकण्यात आले आहे. परदेशी खेळाडूंना मानधन देताना त्या दिवसाच्या डॉलर्सच्या दरानुसारच पैसे देण्यात येणार आहेत. आयपीएल खेळाडूंना मानधनाची रक्कम चार हप्त्यांत मिळते. हंगामाच्या आरंभाआधी 15 टक्के, 1 मेपूर्वी 50 टक्के आणि चॅम्पियन्स कप स्पर्धेआधी 15 टक्के आणि उर्वरित 20 टक्के रक्कम 1 नोव्हेंबरपूर्वी देण्यात येते. यंदाच्या हंगामातील 65 टक्के रक्कम खेळाडूंना मिळाली आहे.