आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पॅनिश फुटबॉल लीग : क्रिस्टियानो रोनाल्डोचा दमदार गोल; माद्रिदची व्हॅलेसियावर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - क्रिस्टियानो रोनाल्डोच्या रियल माद्रिदने घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करून स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये शानदार विजय मिळवला. यजमान माद्रिदने सामन्यात व्हॅलेसियावर 3-2 अशा फरकाने मात केली. या विजयाच्या बळावर पाच गुणांची कमाई करून यजमान टीमने गुणतालिकेत 41 गुणांसह तिसर्‍या स्थानी धडक मारली. बार्सिलोना 46 गुणांसह अव्वलस्थानी आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो (40 मि.), डी मारिया (28 मि.) आणि जेस (82 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून माद्रिदला विजय मिळवून दिला. व्हॅलेसिया सीएफकडून पिआट्टी (34 मि.) आणि माथिइयू (62 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. गुणतालिकेत 11 व्या स्थानी असलेल्या व्हॅलेसियाचा लीगमधील हा नववा पराभव ठरला.
घरच्या मैदानावर डी मारियाने दमदार सुरुवात करताना 28 व्या मिनिटाला रियल माद्रिदला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्याने सामन्यात पहिला मैदानी गोल केला. त्यानंतर सहा मिनिटांत व्हॅलेसियाने सामन्यात 1-1 ने बरोबरी मिळवली. पिआट्टीने 34 व्या मिनिटाला ही किमया साधली. त्याने शानदार मैदानी गोल केला. मात्र, या टीमला ही बरोबरी फार काळ टिकवून ठेवता आली नाही. क्रिस्टियानो रोनाल्डोने 40 व्या मिनिटाला गोलरक्षक व्हिसेट्रे गुट्टीयाला हुलकावणी देऊन शानदार गोल केला. या गोलच्या बळावर माद्रिदने 2-1 ने आघाडी मिळवली. यजमान टीमने मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम ठेवली. मात्र, दुसर्‍या हाफमध्ये मिथाइयुने 62 व्या मिनिटाला गोल करून व्हॅलेसियाला 2-2 ने बरोबरी मिळवून दिली.
पेड्रोचे तीन गोल; बार्सिलोना विजयी
दुसरीकडे गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या बार्सिलोनाने सामन्यात गेटाफे सीएफचा 5-2 ने पराभव केला. पेड्रोने (35, 41, 43 मि.) शानदार तीन गोल करून बार्सिलोनाला विजय मिळवून दिला. फेब्रेगासनेही (68,72 मि.) संघाच्या विजयात दोन गोलचे योगदान दिले. बार्सिलोनाचा स्पर्धेत हा 15 वा विजय ठरला.