आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोची ऑलिम्पिकचा थाटात समारोप, पाहा ऑलिम्पिकदरम्‍यानचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोची(रशिया)- सोची ऑलिम्पिकच्‍या माध्‍यमातून जगाला रशियाची शक्‍ती दाखवू पाहणा-या यजमान रशियाने 13 सुवर्ण पदकासह 33 पदके घेवून पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मोठ्या थाटात समारोप समारंभ पार पडला आहे. रंगारंग कार्यक्रमातच पुढील चार वर्षांनंतर दक्षिण कोरियाच्‍या प्‍योंगचांग येथ्‍ो विंटर ऑलिम्पिक स्‍पर्धा होणार असल्‍याची घोषणा आंतराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीने केली आहे.

उदघाटन समारंभापासूनच सोची ऑलिम्पिक जगभरात चर्चेत राहिले होते. आयोजनाच्‍या माध्‍यमातून रशियाचे राष्‍ट्रपती पुतीन यांनी रशियाचे शक्‍तीप्रदर्शन केले. तसेच अनेक चूकांमुळेसुध्‍दा ही ऑलिम्पिक चर्चेत राहिली. परंतु आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्‍यक्ष थॉमस बाक यांनी स्‍पर्धेच्‍या यशस्‍वी आयोजनाबद्दल रशियाची भरभरून स्‍तुती केली आहे.

सोची ऑलिम्पिकमधील सर्वांत मोठे यश म्‍हणजे सुरक्षाव्‍यवस्‍था होय. कारण इस्‍लामिक दहशतवाद्यांनी या ऑलिम्पिकवर हल्‍ला करण्‍याचा इशारा व्‍यक्‍त केला होता.

पुढील स्‍लाईडवर पाहा, सोची ऑलिम्पिकमधील काही खास क्षणचित्रे...