आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्टिना साबिकोवाला सुवर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोची - चेक गणराज्यच्या मार्टिना साबिकोवाने सोची हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावले.तिने महिलांच्या गटात 5 हजार मीटर स्पीड स्केटिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. एडलर एरेनाच्या स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत चेक गणराज्यच्या मार्टिनाने 6 मिनिट 51.54 सेकंदात यश संपादन केले.
या गटात हॉलंडच्या इरिना वुस्तला रौप्य (6:54:28 से.) आणि कॅरिइन क्लाइबुकेरला (6:55:66 से.) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी हॉलंडच्या खेळाडूंनी 10 हजार स्पीड स्केटिंग प्रकारात तीन पदकांची कमाई केली. याशिवाय हॉलंडच्या जारिट बर्गस्माने नव्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. त्याने 12 मिनिटे 44.45 सेकंदांत 25 लॅपचे अंतर पूर्ण केले. तसेच स्वेन क्रेमर आणि बॉब डी जांगने अनुक्रमे हॉलंडला रौप्य आणि कांस्यपदक मिळवून दिले. दुसरीकडे महिलांच्या गटातही हॉलंडचे खेळाडू चमकले. या टीमने 1500 मीटर स्पीड स्केटिंगमध्ये तीन पदके जिंकली.
डेव्हिड वाइस प्रथम
अमेरिकेच्या डेव्हिड वाइसने फ्रीस्टाइल स्किइंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या गटात कॅनडाचा माइल रिडल दुसर्‍या स्थानी राहिला. तसेच फ्रान्सच्या केविन रॉलैडला तिसर्‍या स्थानी समाधान मानावे लागले. स्नो बोर्ड क्रॉस रेसमध्ये फ्रान्सच्या पियरी वाल्टेयरने सुवर्णपदक पटकावले.