आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोची ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय लज्जित, तिरंग्याविनाच खेळाडू उतरले मैदानात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोची- गेली काही दिवस वादात व चर्चेत राहिलेले रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार फिश्ट ऑलिंपिक स्टेडियममध्ये 22 व्या विंटर (हिवाळी) ऑलिंपिक स्पर्धेचा भव्य उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी स्टेडियममध्ये 40 हजार प्रेक्षक उपस्थित होते. अब्जों रूपये खर्च करून तयार करण्यात आलेले हे ऑलिंपिक स्टेडियम संपूर्णपणे झगमगत होते. उदघाटन समारंभाचे थेट प्रसारण करण्यात येत होते. हा उदघाटन समारंभ जगभरातील 3 कोटी लोकांनी पाहिला.
यंदाच्या विंटर ऑलिंपिकमध्ये 88 देशांचे तीन हजार अॅथलिट 98 गोल्ड मेडलसाठी लढतील. सोची ऑलिंपिक मशाल येथे पोहोचण्याआधी जगभरातील विविध देशांत फिरवली गेली. सुमारे 39 हजार किलोमीटर ही मशाल फिरवली गेली.
असे असले तरी उदघाटन समारंभात भारतीयांना लज्जित व्हावे लागले. कारण या समारंभात तीन भारतीय खेळाडू भारताच्या राष्ट्रीय ध्वजाविनाच मैदानात उतरले. याचे कारण असे, की भारतीय ऑलिंपिक असोसिएशनला (आयओए) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) प्रशासकीय कारणांमुळे निलंबित केले आहे. यामुळेच भारतीय खेळाडू शिवा केशवन, एलपाइन स्कायर हिमांशू ठाकूर आणि क्रॉसकंट्री स्कायर नदीम इक्बाल आयओसीचा ध्वज घेऊन स्पर्धेत सहभागी झाले.
हे सर्व भारतीय खेळाडू वैयक्तिक गटातून विंटर ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी भारताचा नव्हे तर ऑलिंपिक ध्वज हाती घेतला आहे. आयओसीने डिसेंबर 2012 मध्ये आयओएला ऑलिंपिक चार्टरचे पालन न केल्याने निलंबित केले होते. त्यामुळे भारतीय खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करता येत नाहीये. उदघाटन समांरभावेळी त्यामुळेच भारतीय खेळाडूंसह देशवासियांना लज्जित व्हावे लागले. विशेष म्हणजे त्यानंतर लगेच पाकिस्तान, नेपाळ यासारख्या देशांचे खेळाडू आपापल्या देशाचे ध्वज घेऊन मंचावर उपस्थित राहिले.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा या शानदार सोहळ्याचा उदघाटन समारंभ...