आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sochi Olympic Park Lying Desolate And Abandoned In A Year

ऑलिंम्पिक गेमचे साक्षीदार ठरलेले SOCHI आज आहे निर्जण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोची - विंटर ऑलिंम्पिकसाठी वसवल्‍या गेलेले सोची शहर आज निर्जण बनले आहे. एक वर्षांपूर्वी 3,22,167 कोटी रुपये खर्च करुन ऑलिंम्पिक पार्क वसविले गेले. मात्र हे खेळ संपल्‍यानंतर येथील वातावरण मात्र निर्जण बनले आहे.
(फोटो: सोचीमधील ऑलिंम्पिक मशाल)
स्‍थानिक पत्रकार अलेक्‍झांडर वाल्वोने सोची ऑलिम्पिकची एक वर्ष पूर्ण होण्‍याची छायाचित्रे प्रसिध्‍द केली आहेत. 'सोची ऑलिम्पिकसाठी रशियन सरकारने अब्‍जावधी रुपये खर्च केले. त्‍यामुळे रशियाची अर्थव्‍यवस्‍था डबघाईला आली होती.' असे वाल्‍वोने सांगितले आहे.
7 फेब्रुवारी रोजी विंटर ऑलिम्पिक सुरु झाले होते. त्‍याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, त्‍याकडे लोकांनी, पर्यटकांनी दूर्लक्ष केले आहे. यातील काही स्‍टेजची दुरस्‍ती करावी लागणार आहे. 2018 मध्‍ये फुटबॉल विश्‍वचषक रशियात होणार असून त्‍याच्‍यावर अंदाजे चार अब्‍ज रुपयांची उधळपट्टी हाेईल. त्‍याला 'भ्रष्टाचाराचे संग्राहलय' म्‍हणावे लागेल; असेही वाल्‍वो यांनी म्‍हटले आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सोची मधील काही छायाचित्रे...