आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WC 2015 : संघात बिन्नीच्या समावेशामुळे सोशल मीडियावर रोष, सगळे उडवताहेत खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणा-या आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातील बहुतांश नावांवर तज्ज्ञांचे एकमत झाले आहे. तरीही या संघावर काही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
निवडसमितीतील रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीच्या निवडीवरून सोशल मिडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगळवारी रात्रीपर्यंत #Stuart Binny ट्वीटरवर टॉप ट्रेंड मध्ये होते.

युवराजला डावलने
युवराज गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममुळे विश्वचषकाच्या 30 संभाव्य खेळाडुंच्या यादीत स्थान मिळवू शकला नव्हता. मात्र रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने युवराजच्या समावेशाच्या मागणीने जोर धरला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडकर्त्यांसह प्रशिक्षक फ्लेचर यांचीही युवराजला संघात घेण्याची इच्छा होती. पण धोनी त्यासाठी तयार नव्हता. गेल्या विश्वचषकातील युवराजची कामगिरी आणि त्याचा अनुभव तसेच जडेचाच्या खेळण्याबाबतचे प्रश्नचिन्ह या स्थितीतही युवराजला डावलण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जडेजाला संधी
रवींद्र जडेजा खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळेच तो ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेतही खेळला नाही. विश्वचषकाला केवळ एक महिना शिल्लक असल्याने अनफिट जडेजाच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 10 दिवसांत जडेजा फिट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
जखमी इशांतला संधी
जडेजाप्रमाणेच इशांत शर्माही जखमी आहे. पण तरीही त्यालाही संघात जागा मिळाली आहे. वरुण अरॉन, मोहीत शर्मा असे पर्याय असतानाही इशांतवर विश्वास दाखवण्यात आला. विशेष म्हणदे मोहीत शर्माने मंगळवारीच स्थानिक सामन्यांत हॅट्ट्रिक घेतली होती. डेथ ओव्हरमध्ये तो चांगला पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कमी अनुभव असलेल्या बिन्नी पटेल यांना संधी
स्टुअर्ट बिन्नीला केवळ 6 वनडे खेळण्याचा अनुभव आहे. तर अक्षर पटेलने केवळ 9 सामने खेळले आहेत. एवढ्या महत्त्वाच्या स्पर्धेत अनुभवी क्रिकेटपटूंऐवजी तरुणांना संधी देत बीसीसीआयने मोठी खेळी केली आहे. त्याबाबत सोशल मिडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मिडियावरील काही निवडक प्रतिक्रिया