आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Supports Sarita Devi Who Refused To Take Bronze Medal

VIDEO: ASIAD चे पदक ठोकरणा-या सरीतावर बॅन? सोशल मीडिया तिच्या बाजूने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो – पोडियमवर रडताना सरीता देवी)
इंचियोन – भारतीय बॉक्सर एल. सरितादेवीवर बॅन लागण्याची शक्त ता आहे. आंतरराष्ट्रीय अमॅच्युअर बॉक्सिंग संघाने (आयबा) आशियाई ऑलिम्पिक परिषदेला (ओसीए) सादर केलेल्या अहवालात सरिताच्या प्रकरणाची माहिती दिली आहे. भलेही सोशल साइटवर या घटनेची तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. सरीताने पदक न स्विकारण्यालचा निर्णय घेतल्यायने आयोजकांच्याय डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले असल्याची भावना सोशल साइटवर व्ययक्त‍ होत आहे. गुरुवारी #saritadevi टि्वटरच्या टॉप ट्रेंडमध्ये होती.
काय म्हणतो बॉक्सिंग संघ
आंतरराष्ट्रीय अमॅच्युअर बॉक्सिंग संघाने (आयबा) आशियाई ऑलिम्पिक परिषदेला (ओसीए) सादर केलेल्या अहवालात सरिताच्या प्रकरणाची माहिती देण्यात आली. सरिताला मंगळवारी उपांत्य फेरीत कोरियाच्या जिना पार्ककडून वादग्रस्त लढतीत पराभूत व्हावे लागले. सरिताने पंचांनी भेदभाव केलेल्या निर्णयाविरुद्ध बुधवारी कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला. आयबाचे डेव्हिड बी फ्रान्सिस यांनी ओसीएला अहवाल सादर करत सरिताच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली.
दोन वर्षाच्या मुलाला दुर ठेवून केला सराव
एका इंग्रजी टीव्हीद चॅनलला दिलेल्याल मुलाखतीमध्येच सरीतादेवी म्हाणाली की, ‘’आशियाई स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी मी परिवारापासून दूर राहिली. माझ्या दोन वर्षांच्या मुलाला मी सरावामुळे वेळ देवू शकली नाही. त्यामुळे मी त्याची आई आहे हे सुध्दा त्याला माहित नाही. मी जे केले ते योग्येच केले. ते देशासाठीच केले. मी अंतीम सामन्यात धडक देवू शकली असती. माझ्यावर जी कारवाई होईल त्यास मी तयार आहे.’’
काय आहे संपूर्ण प्रकरण
सोमवारी झालेल्या 60 किलो वजनी गटातील बॉक्सिंगमधे पंचांनी दक्षिण कोरियाच्या जिना पार्कला विजयी घोषित केले. विजयाची खरी हकदार सरीता होती. मात्र, पंचांनी या वेळी निर्णय बदलला. त्यांनी कोरियाच्या जिनाच्या बाजूने निकाल दिला. सरितादेवीविरुद्ध जिनाने 39-37 ने आघाडी मिळवली असल्यारचा पंचांचा निर्णय होता. समालोचकांनीही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे भारताच्या एल. सरिता देवीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
पहिली फेरी : दमदार सुरुवात करणारी भारताची ३२ वर्षीय सरिता देवी पहिल्या फेरीत अधिकच आक्रमक होती. सरीता जीना पार्कवर वरचढ ठरली होती.
दुसरी फेरी : भारताच्या सरिताने दुसऱ्या फेरीतही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत जिना सलग एकापाठोपाठ एक असे जोरदार ठोसे लावले.
तिसरी फेरी : सरिताने या फेरीत सरस खेळी केली. जिना मीर रक्तबंबाळ झाली होती. मात्र, या वेळी पंचांनी जिनाच्या बाजूने झुकते माप दिले. सरिताला या निर्णयाचा फटका बसला. जिनाने 39-37 ने लढत जिंकली.

पदक स्विकारण्याास नकार
सरीता पोडिअमवर रडत होती. तिचे चाहते नारेबाजी करत होते. प्रथेप्रमाणे सुवर्ण पदक विजेत्यान देशाचे राष्ट्रडगीत सुरु होते अशा वेळी सरीता पोडिअमवरुन उतरली आणि आपल्यामकडील कांस्यद पदक दक्षिण कोरियाची बॉक्सतर पार्क जीनाच्याअ गळ्यात घातले. तिची अशी प्रतिक्रिया पाहून सर्व खेळाडू आश्चबर्यचकित झाले होते. पार्क जीनाला काय करावे तेच सुचत नव्हयते. पार्क जीनाने पदक सरिताला देऊ केले. परंतु सरीतादेवीने पदक प्रेमाने नाकारले. नंतर पदक पोडिअमवर ठेवून तिने पोडिअम सोडले.

रात्रभर रडत होती सरीता
लाइटवेट प्रकारातील पदक विजेत्यां ना जेव्हान पोडियमध्येक बोलविण्यारत आले तेव्हा सरीताच्या डोळयांत अश्रूंचा पूर होता. ती हमसून हमसून रडत होती. तिचा चेहरा पाहताच ती रात्रभर रडत असल्यातचे दिसत होते.

पुढील स्लाहइडवर पाहा VIDEO, सरीताने कसे नाकारले पदक