आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somadev Devvarman Make Progress In Atp Rank ,sonia Slide

सोमदेव देववर्मनची एटीपी क्रमवारीत प्रगती, सानियाची घसरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचा टेनिस स्टार सोमदेव देववर्मनने नुकत्याच जाहीर झालेल्या एटीपी क्रमवारीत 357 व्या स्थानावर धडक मारली. त्याने आपल्या क्रमवारीत 38 स्थानांनी सुधारणा केली. दुसरीकडे सानिया मिर्झाची 381 व्या स्थानावर घसरण झाली. यापूर्वी, ती 96 व्या स्थानावर विराजमान होती.

खांद्याच्या दुखापतीमुळे सोमदेव देववर्मन मागील सत्रात टेनिस कोर्टपासून बाहेर होता. यामुळे त्याच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली होती. आता त्याने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले आहे. यातून त्याच्या क्रमवारीतही प्रगती झाली. 2011 मध्ये सोमदेवने करिअरमधील सर्वो त्कृष्ट 62 वे स्थान गाठले होते. चिली ओपनच्या फायनलमध्ये नदालला हरवणारा अर्जेंटिनाचा हिरोसियाने 43 वे स्थान पटकावले. त्याने आपल्या क्रमवारीत 38 स्थानांची सुधारणा केली.

दुहेरीच्या क्रमवारीत लिएंडर पेस सातव्या, महेश भूपती 11 व रोहन बोपन्ना 12 व्या स्थानी कायम आहे. सानियाची डब्ल्यूटीए एकेरीच्या क्रमवारीत 96 व्या स्थानावरून घसरणी झाली. एकेरीचे सामने खेळत नसल्या कारणाने सानियाची क्रमवारीत घसरण होते.

टॉप-5 पुरुष
क्रम. खेळाडू देश
1. नोवाक योकोविक सर्बिया
2. रॉजर फेडरर स्वीस
3. अ‍ॅँडी मुरे इंग्लंड
4. डेव्हिड फेरर स्पेन
5. राफेल नदाल स्पेन


टॉप-5 महिला
क्रम. खेळाडू देश
1. अजारेंका बेलारूस
2. सेरेना विल्यम्स अमेरिका
3. मारिया शारापोवा रशिया
4. ए. रांदावास्का पोलंड
5. ली ना चीन