आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somdev, Bopanna Ranking Come Down, Divya Marathi

सोमदेव, बोपन्नाची क्रमवारीत घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एटीपीच्या क्रमवारीत सुधारणा करण्याचा कांगावा करत सोमदेव देववर्मन आणि रोहन बोपन्नाने आशियाई स्पर्धेतून माघार घेतली, तरीही या खेळाडूंना क्रमवारीत मोठा फटका बसला. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमावारीत भारताच्या नंबर वन सोमदेवची पाच स्थानांनी घसरण झाली. त्याने आता १४२ वे स्थान गाठले. याशिवाय बोपन्नाची ३५ व्या स्थानावर घसरण झाली. त्याचे क्रमवारीत सात स्थानांनी नुकसान झाले.

दुसरीकडे भारताचा लिएंडर पेसने एकेरीतील आपले ३० वे स्थान कायम ठेवले. त्याने याशिवाय पुरुष दुहेरीत चेक गणराज्यच्या रादेक स्तेपानेकसोबत १७ वे स्थान कायम ठेवले. पुरव राजा व सनम सिंगची क्रमवारीत प्रत्येकी दोन स्थानांनी घसरण झाली. या दोन्ही युवा खेळाडूंनी अनुक्रमे १२४ आणि १७४ वे स्थान पटकावले.

युकी भांबरीची आघाडी
आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या युकी भांबरीला आपल्या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला. त्याने १८४ वे स्थान पटकावले. त्यापाठोपाठ रामकुमारने क्रमवारीत १९ स्थानांनी आघाडी घेतली. यासह त्याने २६२ व्या स्थानी धडक मारली. जीवनची ३२५ व्या स्थानावर घसरण झाली.