आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somdev Devvarman Goes Down To Lower ranked Malek Jaziri In Dubai Open

योकोविक दुसर्‍या फेरीत; भारताच्या सोमदेवला धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - जगातील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोवाक योकोविकने दुबई ओपन टेनिस स्पध्रेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने पहिल्या लढतीत उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनचा 6-3, 6-3 असा सहज पराभव केला. दुसरीकडे भारताच्या सोमदेव देवबर्मनला दुसर्‍या फेरीत ट्युनिशियाच्या मालेक जजिरीकडून सरळ 3-6, 5-7 अशा सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागले.

जगातील 137 व्या स्थानावर असलेल्या जजिरीने पहिल्या फेरीत हॉलंडच्या इगोर सिजलिंगला पराभूत करून स्पध्रेत धक्कादायक निकाल नोंदवला होता. नुकतेच दिल्ली ओपन जिंकणार्‍या सोमदेवने दुसर्‍या सेटमध्ये चांगले प्रदर्शन केले. मात्र, तो जजिरीचे आव्हान मोडू शकला नाही.