आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somdev Devvarman Rises To 78 In ATP Rankings News In Marathi

क्रमवारीत सोमदेव 78 व्या स्थानावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचा एकेरीतील स्टार खेळाडू सोमदेव देववर्मनने नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत प्रगती साधली. त्याने क्रमवारीत 78 व्या स्थानी धडक मारली. त्याचे क्रमवारीत तीन स्थानांनी नुकसान झाले. युकी भांबरीची मात्र 146 व्या स्थानी घसरण झाली. एकेरीचा नंबर वन खेळाडू सोमदेवने रविवारी दिल्ली ओपनचा किताब जिंकला. या किताबाच्या बळावर त्याने क्रमवारीतही 18 स्थानांनी सुधारणा केली.

ओएनजीसी-जेल दिल्ली ओपनच्या अंतिम सामन्यात सोमदेवने अलेक्सांद्रचा पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. याशिवाय त्याने क्रमवारीत 100 रेटिंग गुणांची कमाई केली. गत आठवड्यात दुबई ओपनच्या पहिल्याच फेरीत सोमदेवला पराभवाचा सामना करावा लागला होता. महेश भूपतीने पुरुष दुहेरीतील दहावे स्थान कायम ठेवले. रोहन बोपन्नाची 16 व्या स्थानी घसरण झाली. सानिया टॉप-10 मधून बाहेर पडली. तिची क्रमवारीत 11 व्या स्थानी घसरण झाली.