आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somdev Devvarman Sinks Nedovyesov To Win Delhi Open News In Amrathi

दिल्ली ओपन टेनिस स्पर्धा : सोमदेव चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतातील एकेरीचा नंबर वन खेळाडू सोमदेव देववर्मन ओएनजीसी-जेल दिल्ली ओपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने रविवारी स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना जिंकला. सोमदेवने फायनलमध्ये अव्वल मानांकित अलेक्झांद्र नेडोव्येसोवला पराभूत केले. त्याने 6-3, 6-0 अशा फरकाने विजय मिळवला. त्याने अवघ्या 59 मिनिटांत अंतिम सामना जिंकून अजिंक्यपदावर नाव कोरले.

याशिवाय भारताच्या सोमदेवने एटीपीचा तिसरा किताब आपल्या नावे केला. यापूर्वी, त्याने 2010 आणि 2008 मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्याने आतापर्यंत एटीपी स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत यशस्वीपणे चार वेळा धडक मारली होती. मात्र, त्याला तीन वेळा अंतिम सामना जिंकता आला.