आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somdev Goes Down Fighting And Sania Crash Out Of Doubles

सोमदेव देववर्मन, सानिया मिर्झा ऑस्‍ट्रेलियन ओपनमधुन बाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मनला दुस-या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तर सानिया मिर्झाचा दुहेरीमध्‍ये पहिल्‍याच फेरीत पराभव झाला. सोमदेव देवबर्मनने कडवी झुंज दिली. तर सानियाचा सहज पराभव झाला.

सोमदेवने पहिल्‍या फेरीत धडाकेबाज विजय मिळविला होता. दुसऱ्या फेरीत त्‍याचा सामना जागतिक क्रमवारीत 26 व्‍या स्‍थानावर असलेल्‍या पोलंडच्‍या जर्झी जानोविचसोबत झाला. ही लढत पाच सेटपर्यंत रंगली. सोमदेवने पहिले दोन सेट जिंकून विजयाच्‍या दिशेने वाटचाल केली होती. पहिला सेट त्‍याने टायब्रेकरमध्‍ये जिंकला. तर दुसरा सेट सहज जिंकला. परंतु, जानोविचने सोमदेवला कडवा प्रतिकार देऊन उर्वरित तिन्‍ही सेट जिंकले. जानोविचने सोमदेवचा 6-7 (10-12), 3-6, 6-1, 6-0, 7-5 असा पराभव केला.

सानिया मिर्झाला मात्र दुस-या फेरीत सहज पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या बेथेनी मटेकसँड हिच्या साथीत खेळणाऱ्या सानिया मिर्झाला पहिल्याच फेरीतून बाहेर पडावे लागले. सिल्विया सोलेर स्पेनोसा आणि कार्ला सोरेझ या जोडीने त्‍यांचा 7-6 (7-4) आणि 6-3 असा सरळ सेटमध्‍ये पराभव केला.