आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मियामी - भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार अमेरिकेची बिथानी माटेक सेंड्स यांनी सोनी ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सानिया-बिथानीच्या सातव्या मानांकित जोडीने सोमवारी दुस-या फेरीत ऑस्ट्रियाची जार्मिला गाज्दोसोवा आणि जर्मनीच्या सबाईन लिसिकी यांना संघर्षमय लढतीत 6-1, 3-6, 10-7 ने हरवले.
आता उपांत्यपूर्व सामन्यात सानिया-बिथानी यांचा सामना सारा इराणी आणि रोबर्टा विंसी या टॉब सिडेड इटलीच्या जोडीशी होईल. पुरुष गटात रोहन बोपन्ना आणि अमेरिकेचा राजीव राम या बिगर मानांकिन जोडीला पुरुष दुहेरीच्या दुस-या फेरीत स्पेनचा मार्सेल ग्रेनोलर्स आणि मार्क लोपेज या दुस-या मानांकित जोडीकडून सरळ सेटमध्ये 4-6, 6-7 ने पराभवाचा सामना करावा लागला.
सेरेना, शारापोवा यांची अंतिम आठमध्ये धडक
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रशियाची मारिया शारापोवा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सेरेनाने चौथ्या फेरीत 13 वी मानांकित स्लोवाकियाच्या डॉमिनिका चिबुलकोवाला संघर्षमय लढतीत 2-6, 6-4, 6-2 ने मात दिली. शारापोवाने 21 वी मानांकित चेक गणराज्यच्या क्लारा जाकोपालोवाला 6-2, 6-2 ने हरवले. दुसरीकडे पुरुष गआत यूएस ओपन चॅम्पियन इंग्लंडचा अँडी मुरे आणि चौथा मानांकित चेक गणराज्यचा थॉमस बर्डिच यांनी चौथी फेरी गाठली आहे. मुरेने बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवला 7-6, 6-3 ने मात दिली. चौथ्या फेरीत त्याचा सामना इटलीच्या आंद्रियास सेप्पीशी होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.