आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियाना वेल्स - भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि कारा ब्लॅकने बीएनपी पॉरीबस ओपन टेनिस स्पर्धेत दमदार विजयाने सुरुवात केली. या जोडीने महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत एम. केयास आणि ए. रिस्केचा पराभव केला. या जोडीने सरळ दोन सेटमध्ये 6-2, 6-4 अशा फरकाने सामना जिंकला. यासह सानिया व कारा ब्लॅकने स्पर्धेच्या दुस-या फेरीतील प्रवेश निश्चित केला.
सानिया-काराने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारली. प्रतिस्पर्धी जोडीला या सेटमध्ये प्रत्युत्तराची संधी मिळाली नाही. त्यानंतर या जोडीने दुस-या सेटमध्ये पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, सानिया-काराने आक्रमक सर्व्हिस करताना दुसरा सेटही आपल्या नावे केला. निर्णायक सेटमध्ये आव्हान टिकवून ठेवता आले नाही.
कुज्नेत्सोवा-स्टोसूर दुस-या फेरीत
दुसरीकडे कुज्नेत्सोवा आणि समंथा स्टोसूरने दुहेरीच्या पहिल्या फेरीत शानदार विजय मिळवला. या विजयासह या जोडीने दुसरी फेरी गाठली. या जोडीने इटलीची सारा इराणी आणि रॉबर्टा व्हिन्सीला पराभूत केले. कुज्नेत्सोवा आणि समंथाने 6-3, 6-3, 10-6 अशा फरकाने सलामी सामना जिंकला. सारा आणि रॉबर्टाने दुस-या सेटमध्ये दमदार पुनरागमन केले.
मार्टिना-लिसिकी पराभूत
स्विसची मार्टिना हिंगिस आणि जर्मनीची सबिना लिसिकीला महिला दुहेरीच्या पंिहल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या जोडीला ऑस्ट्रेलियाची अश्लेइग बार्टी आणि केसी डेल्लाक्युएने पराभूत केले. या जोडीने रंगतदार लढतीत 6-4, 7-6, 10-6 अशा फरकाने विजय मिळवला. पहिल्या सेटमधील निराशाजनक कामगिरीचा मार्टिना आणि लिसिकीला मोठा फटका बसला. मात्र, दुस-या सेटमध्ये या जोडीने पुनरागमन केले. ट्रायब्रेकरपर्यंत खेचलेला दुसरा सेट या जोडीने आपल्या नावे केला. मात्र, तिस-या सेटमध्ये मार्टिना-लिसिकीला विजयी लय कायम ठेवता आली नाही. परिणामी, या जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.