आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sony Open Tennis News In Marathi, Cyprus,Divya Marathi

सोनी ओपन टेनिस : बगदातीसचा रोमहर्षक विजय; सांतियागो बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

की बिस्कायेन - सायप्रसच्या मार्कोस बगदातीसने गुरुवारी सोनी ओपन टेनिस स्पर्धेला रोमहर्षक विजयाने सुरुवात केली. त्याने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात कोलंबियाच्या सांतियागो गिराल्डोवर मात केली. त्याने लढतीत 1-6, 6-2, 7-5 अशा फरकाने विजय मिळवला.


यासाठी बगदातीसला मोठी झुंज द्यावी लागली. त्याने पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करत लढतीत बाजी मारली. तिस-या निर्णायक सेटमध्ये कोलंबियाच्या खेळाडूने बगदातीसला चांगलेच झुंजवले. मात्र, ट्रायब्रेकरपर्यंत खेचलेला सेट बगदातीसने जिंकून दुस-या फेरीतील प्रवेश निश्चित केला. तसेच फ्रान्सच्या जेर्मी चार्डीनेही दुस-या फेरीत प्रवेश केला. त्याने एकेरीच्या पहिल्या फेरीत अर्जेंटिनाच्या जुआन मोनाकोला 7-5, 3-6, 7-6 अशा फरकाने पराभूत केले.


नादिया विजयी : महिला गटात रशियाच्या नादिया पेत्रोवाने विजयी सलामी दिली. तिने सलामी सामन्यात पोलंडच्या उर्सझुला रंदावास्काचा पराभव केला. तिने रंगतदार लढतीत 7-5, 1-6, 6-4 ने विजय मिळवला. तसेच जर्मनीच्या आंद्रे पेत्रोविकनेही शानदार विजयासह दुस-या फेरीत धडक मारली. तिने स्पेनच्या मारियाचा 6-3, 6-4 ने पराभव केला.