आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sony Open Tennis News In Marathi, Serena Williams, Sania Mirza

सोनी ओपन टेनिस: सेरेनाची आगेकूच; सानिया-काराची विजयी सलामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - इंडियाना मास्टर्स उपविजेत्या सानिया मिर्झाने आपली सहकारी कारा ब्लॅकसोबत शुक्रवारी सोनी ओपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. या पाचव्या मानांकित जोडीने सलामी सामन्यात चीनच्या हाओ-चिंग चान आणि युंग जान चानला पराभूत केले. सानिया-काराने रंगतदार लढतीत 6-3, 6-7, 10-8 अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह पाचव्या मानांकित जोडीने स्पर्धेच्या दुस-या फेरीतील प्रवेशही निश्चित केला. आता या जोडीचा सामना जॉर्जियाच्या ओक्साना आणि रशियाच्या अलिसाशी होईल.


शारापोवा तिस-या फेरीत
सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवाने महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. अमेरिकेच्या सेरेनाने दुस-या फेरीत कझाकिस्तानच्या यारोस्लोवा श्वेदोवाचा पराभव केला. तिने 7-6, 6-2 अशा फरकाने सामना जिंकला. तसेच रशियाच्या शारापोवाने जपानची युवा खेळाडू कुरुमी नाराला बाहेरचा रस्ता दाखवला. तिने लढतीत 6-3, 6-4 ने विजय मिळवला. पेत्रा क्वितोवा, सारा इराणीने शानदार विजय मिळवले.


पेस-स्तेपानेकचा पराभव
भारताचा लिएंडर पेस आणि रादेक स्तेपानेकला सलामी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या चौथ्या मानांकित जोडीला अमेरिकेच्या एरिक बुटोराक आणि रावेन क्लासेनने पराभूत केले. या जोडीने 6-3, 7-6 अशा फरकाने सामना जिंकला. वर्षभरात सलग तिस-या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून पेस आणि चेक गणराज्यच्या रादेक स्तेपानेकला पराभवामुळे बाहेर पडावे लागले.