आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्राझील ओपन टेबल टेनिस स्पर्धेचा चषक मनिका बत्रा, सौम्यजीतकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांतोस - भारताचा सौम्यजित घोष व मनिका बत्राने रविवारी आयटीटीएफ वर्ल्ड टूर ब्राझील ओपन टेबल टेनिस स्पर्धेचा चषक पटकावला. मनिकाने महिला गटाच्या फायनलमध्ये यजमान संघाच्या कारोलीन कुमाहरालाचा पराभव केला. तिने 11-5, 9-11, 12-10, 11-5, 11-5 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. दुसरीकडे पुरुष गटात सौम्यजितने फ्रान्सच्या बेंजामिन ब्रोस्सिरवर मात केली. त्याने 8-11, 6-11, 11-7, 11-6, 9-11, 11-7, 11-2 अशा फरकाने विजय मिळवला.

सागरिकाला सुवर्ण
दुसरीकडे सागरिका घोषने ग्वाटेमाला ज्युनियर अ‍ॅँड कॅडेट ओपन टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने महिला कॅडेट गटाच्या अंतिम सामन्यात बर्डी बोरोवर विजय मिळवला. तिने 11-6, 11-5, 11-8 ने सामना आपल्या नावे केला.

‘यापूर्वीही मी कॅरोलिनविरुद्ध सामना खेळले आहे. तिच्या खेळाची मला पूर्ण माहिती आहे. ती आक्रमक खेळाडू आहे. यासाठी मी संथ गतीने खेळण्याचा डावपेच आखला होता,’अशी प्रतिक्रिया मनिकाने दिली.