Home | Sports | From The Field | sourav ganguly play in next ipl

पुढील आयपीएलमध्ये खेळण्याची गांगुलीला इच्छा

Agency | Update - Jun 03, 2011, 01:48 PM IST

नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या चौथ्या मोसमात फारशी चमक दाखवू न शकलेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पुढील आय़पीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • sourav ganguly play in next ipl

    कोलकता - नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या चौथ्या मोसमात फारशी चमक दाखवू न शकलेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पुढील आय़पीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

    गांगुली म्हणाला, आयपीएलमधील विविध संघांमध्ये नवीन खेळाडूंचा समावेश आहे. मी स्वतः चौथ्या मोसमात पुणे वॉरिअर्स संघात सहभागी झालो आहे. त्यामुळे मी पुढील मोसमात ही सहभागी होणार आहे.

    गांगुलीला चौथ्या मोसमात कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. शेवटी स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात पुणे वॉरिअर्सने त्याला विकत घेतले होते. भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर यशस्वी होईल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला आहे.

Trending