आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीकडून कर्णधार म्हणून खूपच आशा : सौरव गांगुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या व अखेरच्या कसोटीत भारताचा माजी कप्तान सौरव गांगुली याने भारताचा नवा कर्णधार विराट कोहली वेगळा अध्याय लिहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. गांगुलीने म्हटले आहे, विराट सर्वगुणसंपन्न आहे. तो स्वत:च्या कामगिरीचे इतरांपुढे उदाहरण ठेवतो. खेळाडूंचा आदर प्राप्त केलेला तो खेळाडू आहे. चांगला कप्तान व महान कप्तान यामधील फरक परदेशातील नेतृत्वाची कामगिरी पाहून जोखता येतो. कोहलीकडून अपेक्षा आहेत.
सिडनी कसोटीबाबत गांगुली म्हणाला, ‘सिडनीची खेळपट्टी फिरकीलाही साथ देते असा आजवरचा अनुभव आहे. सिडनीमध्ये वातावरण उष्ण आहे. त्यामुळे खेळपट्टी कोरडी लवकर होईल. हॉरिसनेही नाराजी व्यक्त केली होती.