आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरव गांगुली टीम इंडियाचा नवा कोच? बीसीसीआय अध्यक्षांची घेतली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी कसोटीपटू आणि जगातील यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला सौरव गांगुली टीम इंडियाचा नवा कोच होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय सूत्रांच्या माहितीनुसार, 'सौरवाला क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामन्यादरम्यान रणनीती कशी तयार करावी लागते याची त्याला माहिती आहे. त्यामुळेच त्याला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.' सूत्रांच्या माहितीनुसार, गांगुली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगनमोहन दालमिया यांच्यात या विषयासंबंधी बैठक झाली आहे. टीम इंडियाचा कोच म्हणून दालमियांची पहिली पसंती गांगुलीला आहे. सध्याचे भारतीय संघाचे कोच इंग्लंडचा दिग्गज माजी खेळाडू डंकन फ्लेचर यांचा कॉन्ट्रॅक्ट वर्ल्डकपपर्यंतच होता. त्यामुळे टीम इंडियासाठी नव्या कोचचा शोध सुरु झाला आहे.
10 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहावी लागेल
बीसीसीआयच्या नियमावलीनुसार, कोचसाठी उमेदवार अर्ज करताता. बीसीसीआयचे अधिकारी आणि टीम इंडियाचा कर्णधार त्यांची मुलाखत घेऊन नंतर निर्णय घेतात. दालमिया यांनी कोचबद्दल अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, कोचबद्दलचा निर्णय होण्यास अजून बरेच दिवस लागणार आहेत. कोच संदर्भातील चित्र स्पष्ट होण्यास जवळपास 10 दिवस लागतील.
राहुल द्रविड देखील शर्यतीत
टीम इंडियाची वॉल म्हणून परिचीत असलेला राहुल द्रविड देखील कोचच्या स्पर्धेत असल्याचे बंगाल क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले आहे. द्रविड देखील गांगुली एवढाच प्रबळ दावेदार आहे. सध्या तो आयपीएल खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा मेंटर आणि कोच आहे. त्याची कामगिरी सध्या सरस आहे. टीम इंडियातील युवा खेळाडूंसाठी द्रविड हा प्रभावी आणि चांगला कोच ठरु शकतो.
रवी शास्त्रींचे पद धोक्यात
सूत्रांच्या माहितीनुसार, जर गांगुली किंवा द्रविडला कोच म्हणून नियुक्त करण्यात आले तर, रवी शास्त्री यांना टीम डायरेक्टर पदावरुन हटवले जाऊ शकते. शास्त्री यांचे काम सध्या टीम कोच आणि टीमचा रिव्ह्यू घेऊन त्याची माहिती बीसीसीआयला देण्याची आहे.