आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जावधींचा खेळ आहे IPL, सामने सुरु होण्याआधीच टीम मालक होतात मालामाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग-8 चा धुम धडाका सुरु होण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. क्रिकेकचा रोमांच आणि एकाच वेळी जगातील दिग्गजांना खेळताना पाहाण्यासाठी भारतीय चाहते उत्सूक आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे कोट्यवधींची कमाई. टीम मालकांसाठी हा केवळ क्रिकेटचा खेळ नाही तर, त्यांच्यासाठी हा बिझनेस गेम आहे. त्यामुळेच अर्थतज्ज्ञ आयपीएलचा अर्थ इंडियन पैसा लीग असा काढतात. तर जाणून घेऊया इंडियन प्रीमियर लीगमध्ये कसा पडतो पैशांचा पाऊस.
रेव्हेन्यू मॉडेल
आयपीएलमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयपीएल संघांचे मालक हे कॉर्पोरेट हाऊस मधून आले आहेत किंवा सेलिब्रिटी आहेत. त्यांना लिलावाच्या माध्यमातून खेळाडू खरेदी करावे लागतात. त्यासाठी टीम मालकांना आयपीएल एक निश्चित आकडा निश्चित करते. लिलावाआधी खेळाडूंची बेस प्राइज निर्धारीत केली जाते. ही पद्धत इंग्लंडच्या बार्केलेज इंग्लिश प्रीमियर लीगकडून जशीच्या तशी घेण्यात आली आहे. 2008 मध्ये आयपीएलच्या आठ टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यांची बेस प्राइज (कमीत कमी किंमत) 400 मिलियन डॉलर ठेवण्यात आली होती.त्यानंतर या बोलीत वाढ होऊन आता ती 723 मिलियन डॉलर पर्यंत पोहोचली आहे.
आयपीएलमध्ये असा येतो पैसा
- ब्रॉडकास्टिंग राइट्स विक्री करुन.
- टायटल स्पॉन्सरशिप आणि कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप यातून.
- फ्रेंचायझी राईट्सच्या विक्रीतून.
- तिकीट विक्री फक्त 20 टक्के
- अंपायर्सच्या ऑफिशिअल स्पॉन्सरशिपमधून
फ्रेंचायझी असा कमावतात पैसा
- ब्राडकास्टिंग राइट्सच्या कमाईत त्यांचा शेअर असतो.
- स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून येणारा पैसा, यात शेअर असतो.
- तिकीट विक्रीतून होणार्‍या उत्पन्नात वाटा असतो.
- मैदानात लावलेल्या जाहिरात फलकांच्या माध्मातून मिळणारा पैसा
- गरज पडली तर, आपला खेळाडू दुसर्‍या फ्रेंचायझीला विकण्याचा अधिकार असतो.
- स्वतःची स्पॉन्सरशिप आणि कार्पोरेट स्पॉन्सरशिप यातून कमाई होते.
फोटो - सादरीकरणासाठी वापरण्यात आला आहे.