आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Africa Beat England By 3 Runs, News In Marathi

टी-20 : द. आफ्रिकेची विजयी हॅट्ट्रिक; इंग्लंडचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितगाव - दक्षिण आफ्रिका टीमने शनिवारी आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली. या टीमने इंग्लंडवर 3 धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 5 बाद 196 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 7 गडी गमावून 193 धावा काढल्या. वायने पार्नेल (3/31) आणि इम्रान ताहीर (2/27) यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर आफ्रिकेने सामना जिंकला. अ‍ॅलेक्स हेल्सने टीमकडून सर्वाधिक 38 धावांची खेळी केली. तत्पूर्वी, आफ्रिकेकडून हाशिम आमला (56) आणि डिव्हिलर्सने (69) शानदार अर्धशतकी खेळी केली.