आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Africa Beat Pakistan In A Thrilling Match By One Run

द. आफ्रिकेचा पाकिस्तानवर एका धावेने रोमांचक विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारजा- दक्षिण आफ्रिका संघाने बुधवारी रात्री एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानावर एका धावेने रोमांचक विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 49.5 षटकांत 183 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा 46.3 षटकांत 182 धावांवर गाशा गुंडाळला गेला. पाककडून मिसबाह-उल-हक (31), उमर अमीन (20), उमर अकमल (18), मो. हाफिज (28) यांनी धावांसाठी संघर्ष केला. शहजादने 92 चेंडूंत पाच चौकारांसह संघाकडून सर्वाधिक 58 धावा काढल्या. गोलंदाजीत पार्नेल, इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात आफ्रिकेकडून पार्नेलने अष्टपैलू कामगिरी करताना गोलंदाजीनंतर 70 चेंडूंचा सामना करताना सहा चौकारांसह एक षटकार ठोकून 56 धावा काढल्या.