आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Africa In Trouble As England Bowlers Take Early Wickets

चॅम्पियन्‍स करंडकः इंग्‍लंडला दुसरा धक्‍का, कॅप्‍टन कुक बाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चॅम्पियन्‍स करंडक स्‍पर्धेच्‍या पहिल्‍या उपांत्‍य लढतीत 176 धावांच्‍या आव्‍हानाचा पाठलाग करताना इंग्‍लंडचा दुसरा फलंदाज बाद झाला आहे. ख्रिस मॉरीसने कर्णधार ऍलिस्‍टर कुकला झटपट बाद केले. कुकने 6 धावा केल्‍या.

मिलरच्‍या अर्धशतकाने दक्षिण आफ्रिकेला सावरले
दक्षिण आफ्रिकेचा डाव 175 धावांमध्‍ये संपुष्‍टात आला. दक्षिण आफ्रिकेचा डाव अडचणीत आला होता. परंतु, डेव्‍हीड मिलरने धडाकेबाज अर्धशतक ठोकून डाव सावरला. अवघ्‍या 80 धावांवर 8 फलंदाज तंबूत परतल्‍यानंतर धडाकेबाज फलंदाज डेव्‍हीड मिलर आणि रोरी लेनव्‍हेल्‍ट यांनी अर्धशतकी भागीदारी करुन डाव सावरला. इंग्लंडच्‍या वेगवान गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेची आघाडीची फळी कोलमडली. एका वेळेस अवघ्‍या 63 धावांमध्‍ये दक्षिण आफ्रिकेचे 5 फलंदाज बाद झाले होते. जेम्‍स अ‍ॅंडरसनने 2, जेम्‍स ट्रेडवेलने 3 तर स्‍टुअर्ट ब्रॉड आणि स्‍टीव्‍ह फिन यांनी प्रत्‍येकी 1 बळी घेतला.

डेव्‍हीड मिलरने 45 चेंडुंमध्‍ये 2 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. तर दुस-या बाजूने लेनव्‍हेल्‍टने 1 षटकार आणि 4 चौकार ठोकून मिलरला मोलाची साथ दिली.