आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये द. आफ्रिका टॉपवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - द. आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेऊन आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 1 एप्रिल 2013 च्या कट ऑफ तारखेपर्यंत नंबर वन स्थानावरील ताबा जवळपास निश्चित केला आहे. या कामगिरीमुळे द. आफ्रिका संघाला साडेचार लाख डॉलर (जवळपास अडीच कोटी रुपये) मिळतील.
पाकिस्तानविरुद्ध दुस-या कसोटीत आफ्रिकेच्या चार विकेटने विजयामुळे ही टीम क्रमवारीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक पुढे निघून जाईल, हे निश्चित झाले आहे. इंग्लंड सध्या न्यूझीलंडच्या दौ-यावर, तर ऑस्ट्रेलिया भारत दौ-यावर आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत या वेळी बक्षीस रकमेत चांगलीच वाढ झाली आहे. पूर्वी कसोटी आणि वनडे चॅम्पियनशिपमध्ये अव्वलस्थानी असलेल्या संघाला 1, 75000 डॉलर (जवळपास 95 लाख रुपये) इतकी रक्कम मिळत होती.

आफ्रिकेने नंबर वनवरील आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, दुस-या , तिस-या आणि चौथ्या स्थानासाठी स्पर्धा रंगणार आहे. दुस-या स्थानी असलेला इंग्लंड आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारतादरम्यान केवळ 13 गुणांचे अंतर आहे.

2.50 कोटी रुपये मिळणे जवळपास निश्चित आहे.
1.90 कोटी रुपये नंबर टू इंग्लंडला मिळणार .


लाखोंचे बक्षीस मिळणार
कट ऑफ तारखेपर्यंत दुसरे स्थान मिळवणा-या संघाला साडेतीन लाख डॉलर (जवळपास 1.90 कोटी), तिस-या स्थानावरील संघाला अडीच लाख डॉलर (1.35 कोटी), तर चौथ्या स्थानी आलेल्या संघाला दीड लाख डॉलर (जवळपास 81 लाख रुपये) मिळतील.
भारताला आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत विजय मिळवून क्रमवारीत पाचव्या स्थानावरून पुढे येण्याची संधी असेल.


कसोटी क्रमवारी
क्र. देश गुण
1. द.आफ्रिका 124
2. इंग्लंड 118
3. ऑ स्ट्रेलिया 117
4. पाकिस्तान 109
5. भारत 105
6. श्रीलंका 92.
7. वेस्ट इंडीज 91.
8. न्यूझीलंड 87
9. बांगलादेश, 0