आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Africa Tour May Be Reshuffle Says Jagmohan Dalmiya

दक्षिण आफ्रिका दौ-याचा कार्यक्रम बदलू शकतो- जगमोहन दालमिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- टीम इंडियाच्‍या नोव्‍हेंबर महिन्‍यात होणा-या दक्षिण अ‍ाफ्रिका दौ-यात बदल होऊ शकतो, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) हंगामी अध्‍यक्ष जगमोहन दालमिया यांनी म्‍हटले आहे.

दोन सामन्‍यांमधील अंतर योग्‍य नसल्‍यामुळे यावर अभ्‍यास केला जाईल, असे दालमियांनी सांगितले. दोन्‍ही देशांची क्रिकेट मंडळे हा कार्यक्रम ठीक करतील. माध्‍यमांनी याचा मुद्दा बनवू नये, असेही सांगण्‍यास ते विसरले नाहीत.

सूत्रांकडून मिळालेल्‍या वृत्तानुसार बीसीसीआयने दौ-याचा कार्यक्रमावर आक्षेप नोंदवत दक्षिण आफ्रिका मंडळाला बीसीसीआयच्‍या सहमतीशिवाय कार्यक्रम बनवल्‍याचे म्‍हटले होते. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने जाहीर केलेल्‍या कार्यक्रमानुसार मालिकेत दोन टी-20, सात वनडे आणि तीन कसोटी सामन्‍यांचा समावेश आहे. ही मालिका 19 जानेवारी रोजी संपणार आहे.