आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Africa V Australia, Third Test Match News In Marathi

तिसर्‍या कसोटीसाठी वॉटसन, पॅटिन्सनला मिळणार संधी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट एलिझाबेथ - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसर्‍या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवामुळे आता ऑस्ट्रेलियाने टीममध्ये बदल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर ऑलराउंडर शेन वॉटसनला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शॉन मार्शला विर्शांती देण्यात येईल. येत्या शनिवारपासून केपटाऊन येथे मालिकेतील तिसर्‍या कसोटीला प्रारंभ होत आहे. या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज जेस पॅटिन्सन आणि जॅक्सन बर्डला पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

सेंच्युरियन कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत दमदार सुरुवात केली. मात्र, आफ्रिकेने दुसर्‍याच कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा रथ रोखला. याशिवाय आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला धूळ चारून मालिकेत 1-1 ने बराबेरी साधली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांनी वेगवान गोलंदाज रेयान हॅरिस, पीटर सिडलला आराम देण्याचे संकेत दिले.